रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून काम करणाऱ्यांमध्ये डॉ. प्रमोद निफाडकर यांचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागेल. त्यांच्या निधनामुळे अस्थमा रुग्णांचा आशेचा किरण हरपला आहे. तब्बल तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतातील अस्थमा रुग्णांची सेवा करण्यात घालवले. वयाच्या अवघ्या ५७ व्या वर्षी कॅन्सरने झालेले त्यांचे निधन वैद्यक क्षेत्रालाही चटका लावून गेले.
जे.जे. रुग्णालय व ग्रँट मेडिकल कॉलेजमधून ‘एमडी’ केल्यानंतर अमेरिकेतील क्लिव्हलँड क्लिनिकमधून अस्थमा व अॅलर्जीतील पदव्युत्तर शिक्षण घेतले. खरे तर अमेरिकेतच सुखासीन जीवन त्यांना जगता आले असते. मात्र भारतातील गोरगरीब रुग्णांची सेवा करण्यासाठी ते मुंबईत परत आले. खासगी तसेच शासनाच्या सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या माध्यमातून ते हजारो अस्थमा रुग्णांवर उपचार व संशोधन करीत होते. ‘अॅलर्जी’ या विषयातही त्यांची मास्टरी होती. भारतात मधुमेह, हृदयविकाराबरोबरच अस्थमा रुग्णांची संख्याही भयावह म्हणावी एवढय़ा वेगाने वाढत चालली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात २०२० मध्ये भारत ही अस्थमा रुग्णांची राजधानी बनेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर डॉ. निफाडकर यांनी शहरी व ग्रामीण भागातील अस्थमा रुग्णांसाठी केलेल्या संशोधनाचे महत्त्व अनन्यसाधारण म्हणावे लागेल. प्रामुख्याने शहरी भागात लहान मुलांमध्ये अस्थमा होण्याचे प्रमाण प्रचंड आहे. एकटय़ा मुंबईत १० लाख अस्थमा रुग्ण असून त्यामध्ये लहान मुलांची संख्या सहा लाख एवढी आहे. या रुग्णांच्या औषधावरील खर्च मोठा असून डॉ. निफाडकर यांनी केलेल्या संशोधनातून योग्य आहारविहार, घरात खेळती हवा ठेवल्यास तसेच अन्य काही उपाय केल्यास औषधाचा खर्च निम्म्याने कमी होतो हे दाखवून दिले. यामुळेच त्यांच्या संशोधनकार्यात कधीही वैद्यकीय कंपन्यांनी मदत केली नाही. ‘अस्थमा अॅण्ड ब्राँकायटीस असोसिएशन ऑफ इंडिया’चे ते २० वर्षांहून अधिक काळ सचिव होते. या संस्थेच्या माध्यमातून तीन आंतरराष्ट्रीय परिषदा, अस्थमासंदर्भात फॅमिली डॉक्टरांना प्रशिक्षण देणाऱ्या ५० हून अधिक कार्यशाळा, अस्थमा रुग्णांमध्ये आत्मविश्वास जागा करण्यासाठी ४०० हून अधिक शिबिरांचे आयोजन, शिक्षण, प्रबोधन, रुग्णांसाठी व्याख्याने, शोधनिबंध, पुस्तक लिखाण, वाचनालय असे जनजागृतीचे अनेक उपक्रम त्यांनी गेल्या तीन दशकांमध्ये केले. हा उपक्रम राबविताना त्यांनी दिल्लीच्या सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. बलराम घोष यांच्या सहकार्याने एक संशोधनही केले होते. यात शिखराच्या पायथ्याशी असताना अस्थमा रुग्णांच्या फुप्फुसाची क्षमता व शिखरावर चढल्यानंतर त्यात होणारे बदल यांचा अभ्यास करून स्टिरॉईड न घेताही फुप्फुसाची कार्यक्षमता कशी वाढवता येते हे दाखवून दिले. यावर अधिक संशोधन सुरू होते. औषध कंपन्यांच्या मुळावर येणाऱ्या या संशोधनासाठी कोणतीच औषध कंपनी पुढे येणे शक्य नव्हते. मात्र पदराला खार लावून त्यांनी आपले संशोधन व अस्थमा रुग्णांसाठीचे उपक्रम सुरूच ठेवले हेते. त्यांच्या खासगी दवाखान्यातही येणाऱ्या शेकडो गोरगरीब रुग्णांवर ते मोफत उपचार करीत असत. त्यांच्या निधनामुळे अस्थमा रुग्णांच्या जीवनातील आशेचा एक किरण हरपला आहे.
निफाडकर, प्रमोद