नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे दूरशिक्षणाच्या क्षेत्रात दोन दशकांहून अधिक काळ मोलाचे योगदान आहे. सध्याच्या ‘डिजिटल’ युगामध्ये बहुमाध्यम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दूरशिक्षणाची व्याप्ती आणखी वाढविणे शक्य आहे आणि याच आव्हानाला सामोरे जात डॉ. आर. कृष्णकुमार मुक्त विद्यापीठाचे कुलगुरुपद स्वीकारतील. डॉ. कृष्णकुमार हे मूळचे नागपूरचे. पदार्थविज्ञान क्षेत्रात उच्चशिक्षण व पीएच.डी. दर्जाचे संशोधन केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते रुजू झाले. नागपूर विद्यापीठातील महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालकपद सांभाळत त्यांनी विद्यापीठीय प्रशासन-व्यवस्थापनाचा अनुभव घेतला. उच्चशिक्षण क्षेत्रात पंचवीसहून अधिक वर्षांच्या कारकीर्दीनंतर त्यांची केरळच्या राज्यपालांचे विशेष सचिव म्हणून नियुक्ती झाली. आता मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून कौशल्याधारित प्रशिक्षणाची चळवळ ते उभारणार आहेत. ‘भारताकडे जागतिक महासत्ता म्हणून पाहिले जात आहे. मात्र उपलब्ध मनुष्यबळाला कौशल्याधारित प्रशिक्षण मिळाले नाही, तर लोकसंख्येतील ही लाभजन्य स्थिती अल्पावधीतच देशासाठी मोठी डोकेदुखी ठरेल. सध्याच्या बहुतांश पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्यांचा अभाव आहे. सामाजिक, आर्थिक गरजांमुळे रोजगारप्राप्तीच्या मार्गाने गेलेल्या फक्त दहा टक्के मनुष्यबळाला कौशल्याधारित प्रशिक्षण मिळाले आहे. या पाश्र्वभूमीवर प्रत्यक्ष कंपनीच्या आवारामध्येच जाऊन कौशल्याभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रकल्प राबविण्याचा त्यांचा मानस आहे. ‘उच्चशिक्षणाच्या विस्ताराबरोबरच ज्ञानाधारित समाजात कालानुरूप कौशल्यांचा दर्जा वाढविण्याचे आव्हानही मुक्त विद्यापीठाला पेलायचे आहे. त्यासाठी अभ्यासक्रम पुनर्रचना करण्याची मोहीम मी हाती घेणार आहे,’ असे कृष्णकुमार सांगतात.”
डॉ. आर. कृष्णकुमार
नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे दूरशिक्षणाच्या क्षेत्रात दोन दशकांहून अधिक काळ मोलाचे योगदान आहे. सध्याच्या ‘डिजिटल’ युगामध्ये बहुमाध्यम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दूरशिक्षणाची व्याप्ती आणखी वाढविणे शक्य आहे आणि याच आव्हानाला सामोरे जात डॉ. आर. कृष्णकुमार मुक्त विद्यापीठाचे कुलगुरुपद स्वीकारतील. डॉ. कृष्णकुमार हे मूळचे नागपूरचे. पदार्थविज्ञान क्षेत्रात उच्चशिक्षण व पीएच.डी. दर्जाचे संशोधन केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते रुजू झाले. नागपूर विद्यापीठातील महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालकपद सांभाळत त्यांनी विद्यापीठीय प्रशासन-व्यवस्थापनाचा अनुभव घेतला. उच्चशिक्षण क्षेत्रात पंचवीसहून अधिक वर्षांच्या कारकीर्दीनंतर त्यांची केरळच्या राज्यपालांचे विशेष सचिव म्हणून नियुक्ती झाली. आता मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून कौशल्याधारित प्रशिक्षणाची चळवळ ते उभारणार आहेत. ‘भारताकडे जागतिक महासत्ता म्हणून पाहिले जात आहे. मात्र उपलब्ध मनुष्यबळाला कौशल्याधारित प्रशिक्षण मिळाले नाही, तर लोकसंख्येतील ही लाभजन्य स्थिती अल्पावधीतच देशासाठी मोठी डोकेदुखी ठरेल. सध्याच्या बहुतांश पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्यांचा अभाव आहे. सामाजिक, आर्थिक गरजांमुळे रोजगारप्राप्तीच्या मार्गाने गेलेल्या फक्त दहा टक्के मनुष्यबळाला कौशल्याधारित प्रशिक्षण मिळाले आहे. या पाश्र्वभूमीवर प्रत्यक्ष कंपनीच्या आवारामध्येच जाऊन कौशल्याभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रकल्प राबविण्याचा त्यांचा मानस आहे. ‘उच्चशिक्षणाच्या विस्ताराबरोबरच ज्ञानाधारित समाजात कालानुरूप कौशल्यांचा दर्जा वाढविण्याचे आव्हानही मुक्त विद्यापीठाला पेलायचे आहे. त्यासाठी अभ्यासक्रम पुनर्रचना करण्याची मोहीम मी हाती घेणार आहे,’ असे कृष्णकुमार सांगतात."