केतकी देसाई

देसाई, केतकी

‘मूळची पुण्याची’ ही केतकी देसाईची ओळख मराठीजनांना सुखावणारी जरूर आहे, पण केतकीने आपले विश्वनागरिकत्व सिद्ध केले आहे.. किंबहुना त्यामुळेच तिचे कौतुक. रवांडासारख्या मागास आफ्रिकी देशात ‘वन लॅपटॉप पर चाइल्ड’ (ओएलपीसी) सारख्या - विद्यार्थ्यांना परवडणारे लॅपटॉप उपलब्ध करून देणाऱ्या योजनेला मर्यादितच यश का मिळते आणि हे यश वाढवून, जगभरातील विद्यार्थ्यांना लॅपटॉपचा लाभ कसा मिळेल, याचा मार्ग दाखवण्याची जबाबदारी केतकीसह तिच्या तिघा सहपाठय़ांनी उत्तमपणे पार पाडली आहे आणि यावर ‘हल्ट ग्लोबल केस चॅलेंज’च्या पुरस्काराची मोहोरही उमटली आहे. केतकी ही कार्नेजी मेलन विद्यापीठातील ‘हाइन्झ कॉलेज’मध्ये सार्वजनिक धोरण-व्यवस्थापनाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम (मास्टर ऑफ पब्लिक मॅनेजमेंट) शिकते आहे. जग बदलण्याचा आटापिटा स्वत: करू नका.. बदलांमध्ये अनेकांचा वाटा असतो, त्यापैकी योग्य वाटेकऱ्यांची सांगड घालून देणे हे काम अधिक महत्त्वाचे माना’ हा संस्कार या अभ्यासक्रमामुळेच केतकीवर झाला आणि हे आपल्याला कितपत करता येईल या विचारातूनच आपण कॉलेजतर्फे या जागतिक महत्त्वाच्या स्पर्धेत सहभागी झालो, असे तिने म्हटले आहे.

पथकामध्ये चौघेजण असल्याने मतभेदांना वाव भरपूर होता. पण निर्णय म्हणजे मतभेदांचे व्यवस्थापन, हे एकदा ओळखले की प्रश्न सुटतात, असा केतकीचा विश्वास आहे. केतकीचे नेतृत्वगुण यापूर्वीही सिद्ध झाले आहेत. अमेरिकेतून जगभर पोहोतच असलेल्या ‘टेड’ या विचारविनिमय चळवळीचे कार्नेजी मेलन विद्यापीठातील केंद्र केतकीच्या अध्यक्षतेखाली चालते. ‘नेटवर्क ऑफ इंडियन प्रोफेशनल्स ऑफ नॉर्थ अमेरिका’ या संस्थेच्या पीट्सबर्ग शाखेची ती सह-अध्यक्ष होती. वैद्यक आणि सॉफ्टवेअर क्षेत्रांची सांगड घालण्याचे आव्हान असलेले तीन प्रकल्प तिने यापूर्वी पूर्ण केले आहेत. यानंतर, जगभरातील मुलांचे शिक्षणाचे प्रश्न कोणते हे आधी समजून घेऊन मग ‘ओएलपीसी’सारख्या योजनांच्या यशापयशाचा मार्ग कसा आहे व कसा असायला हवा हे ठरवण्याच्या स्पर्धेत आपण उतरायचे आहे, हे केतकीने ओळखले आणि तिथे तिचे विश्वनागरिकत्व झळाळले!

देसाई, केतकी

‘मूळची पुण्याची’ ही केतकी देसाईची ओळख मराठीजनांना सुखावणारी जरूर आहे, पण केतकीने आपले विश्वनागरिकत्व सिद्ध केले आहे.. किंबहुना त्यामुळेच तिचे कौतुक. रवांडासारख्या मागास आफ्रिकी देशात ‘वन लॅपटॉप पर चाइल्ड’ (ओएलपीसी) सारख्या – विद्यार्थ्यांना परवडणारे लॅपटॉप उपलब्ध करून देणाऱ्या योजनेला मर्यादितच यश का मिळते आणि हे यश वाढवून, जगभरातील विद्यार्थ्यांना लॅपटॉपचा लाभ कसा मिळेल, याचा मार्ग दाखवण्याची जबाबदारी केतकीसह तिच्या तिघा सहपाठय़ांनी उत्तमपणे पार पाडली आहे आणि यावर ‘हल्ट ग्लोबल केस चॅलेंज’च्या पुरस्काराची मोहोरही उमटली आहे. केतकी ही कार्नेजी मेलन विद्यापीठातील ‘हाइन्झ कॉलेज’मध्ये सार्वजनिक धोरण-व्यवस्थापनाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम (मास्टर ऑफ पब्लिक मॅनेजमेंट) शिकते आहे. जग बदलण्याचा आटापिटा स्वत: करू नका.. बदलांमध्ये अनेकांचा वाटा असतो, त्यापैकी योग्य वाटेकऱ्यांची सांगड घालून देणे हे काम अधिक महत्त्वाचे माना’ हा संस्कार या अभ्यासक्रमामुळेच केतकीवर झाला आणि हे आपल्याला कितपत करता येईल या विचारातूनच आपण कॉलेजतर्फे या जागतिक महत्त्वाच्या स्पर्धेत सहभागी झालो, असे तिने म्हटले आहे.

Author