डॉ. रामचंद काशीनाथ भिडे हे 'फास्ट ट्रॅक ओपन हार्ट सर्जरी' करणारे पहिले भारतीय डॉक्टर होते. 'सुप्रापीप' या आज सर्जनप्रिय झालेल्या सुरक्षित तंत्राचे जनकत्वही त्यांच्याकडेच जाते. त्यांनी दहा हजारांवर हृदयशस्त्रक्रिया केल्या होत्या. असंख्य रुग्णांना त्यांनी मृत्युशय्येवरून परत आणून जीवनदान दिले. वैद्यकीय क्षेत्र आज अनैतिक व्यवहारांमुळे बदनाम होत आहे. अशा काळात डॉ. भिडे प्रथम आपली लाईफ स्टाईल बदलून शस्त्रक्रिया कशी टाळता येईल याचा सल्ला पेशंटांना देत असत.
या संशोधनाचे पेटंटही डॉ. भिडे यांना मिळाले होते. गरीबांना आपल्या संशोधनाचा फायदा व्हावा; अशी त्यांची भूमिका असे. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या या संशोधनाची दखल घेण्यात आली होती.
नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात मानद हृदय शल्यचिकित्सक म्हणून काम पाहणार्या डॉ. भिडे यांनी ज्येष्ठ प्राध्यापक या नात्याने त्यांनी बजावलेली कामगिरी तर फार मोलाची ठरली. ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट व डॉक्टरेटचे विद्यार्थी यांना त्यांनी सलग नऊ वर्षे मार्गदर्शन केले. आपल्या देशातील तसेच अमेरिकेतील असंख्य विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला. कृत्रिम हृदय विकसित करण्याच्या संशोधनासाठी महाराष्ट्र, गुजरात व केंद सरकारचे पुरेसे सहकार्य न मिळाल्याने नाइलाजाने त्यांना जर्मनीला जावे लागले. स्वभावाने नम्र, व्यवसायात प्रामाणिक आणि प्रसिद्धीपासून दूर असे डॉ. भिडे सतत देशाचाच विचार करत.
ते ज्युदो आणि अॅथलेटिक्सचे चॅम्पियन होते. वक्तृत्व, परिसंवाद आणि लेखनात त्यांनी अनेक पारितोषिके पटकावली. ठाण्यात ते भाड्याच्या घरात राहत, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.
अधिक संशोधन, प्रयोग व प्रशिक्षणाकरिता त्यांनी मृत्युच्या चार-पाच महिन्यापूर्वीच जर्मनीला प्रयाण केले. जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या जर्मनीमधील हार्ट अॅन्ड डायबेटीस सेंटरमध्ये त्यादृष्टीने त्यांची आगेकूच चालू होती. ब्रिटिश कौन्सिलनेही त्यांच्या संशोधनासाठी अनुदान मंजूर केले होते.
हजारो रुग्णांवर ह्रदयशस्त्रक्रिया करून त्यांना नवी जीवनसंजीवनी देणार्या डॉ. भिडे यांना काळाच्या पडद्याआड नेलं ते सुध्दा एका ह्रदयविकारानेच. डॉ. भिडे यांच्या अकाली निधनाने कृत्रिम हृदय विकसित करण्याच्या प्रयत्नातील भारतातला मोठा संशोधक, शास्त्रज्ञ तसेच एक समाजसेवक हरपला आहे.
डॉ. भिडे अवघ्या पन्नास वर्षांचे होते. सारा मित्रपरिवार आणि पेशंटही त्यांना 'नंदू भिडे' या नावानेच ओळखत. त्यांचे कृत्रिम हृदय प्राण्यांना बसविण्याचे प्रयोग सुरू होते.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
डॉ. रामचंद काशीनाथ भिडे हे ‘फास्ट ट्रॅक ओपन हार्ट सर्जरी’ करणारे पहिले भारतीय डॉक्टर होते. ‘सुप्रापीप’ या आज सर्जनप्रिय झालेल्या सुरक्षित तंत्राचे जनकत्वही त्यांच्याकडेच जाते. त्यांनी दहा हजारांवर हृदयशस्त्रक्रिया केल्या होत्या. असंख्य रुग्णांना त्यांनी मृत्युशय्येवरून परत आणून जीवनदान दिले. वैद्यकीय क्षेत्र आज अनैतिक व्यवहारांमुळे बदनाम होत आहे. अशा काळात डॉ. भिडे प्रथम आपली लाईफ स्टाईल बदलून शस्त्रक्रिया कशी टाळता येईल याचा सल्ला पेशंटांना देत असत.
या संशोधनाचे पेटंटही डॉ. भिडे यांना मिळाले होते. गरीबांना आपल्या संशोधनाचा फायदा व्हावा; अशी त्यांची भूमिका असे. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या या संशोधनाची दखल घेण्यात आली होती.
नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात मानद हृदय शल्यचिकित्सक म्हणून काम पाहणार्या डॉ. भिडे यांनी ज्येष्ठ प्राध्यापक या नात्याने त्यांनी बजावलेली कामगिरी तर फार मोलाची ठरली. ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट व डॉक्टरेटचे विद्यार्थी यांना त्यांनी सलग नऊ वर्षे मार्गदर्शन केले. आपल्या देशातील तसेच अमेरिकेतील असंख्य विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला. कृत्रिम हृदय विकसित करण्याच्या संशोधनासाठी महाराष्ट्र, गुजरात व केंद सरकारचे पुरेसे सहकार्य न मिळाल्याने नाइलाजाने त्यांना जर्मनीला जावे लागले. स्वभावाने नम्र, व्यवसायात प्रामाणिक आणि प्रसिद्धीपासून दूर असे डॉ. भिडे सतत देशाचाच विचार करत.
ते ज्युदो आणि अॅथलेटिक्सचे चॅम्पियन होते. वक्तृत्व, परिसंवाद आणि लेखनात त्यांनी अनेक पारितोषिके पटकावली. ठाण्यात ते भाड्याच्या घरात राहत, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.
अधिक संशोधन, प्रयोग व प्रशिक्षणाकरिता त्यांनी मृत्युच्या चार-पाच महिन्यापूर्वीच जर्मनीला प्रयाण केले. जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या जर्मनीमधील हार्ट अॅन्ड डायबेटीस सेंटरमध्ये त्यादृष्टीने त्यांची आगेकूच चालू होती. ब्रिटिश कौन्सिलनेही त्यांच्या संशोधनासाठी अनुदान मंजूर केले होते.
हजारो रुग्णांवर ह्रदयशस्त्रक्रिया करून त्यांना नवी जीवनसंजीवनी देणार्या डॉ. भिडे यांना काळाच्या पडद्याआड नेलं ते सुध्दा एका ह्रदयविकारानेच. डॉ. भिडे यांच्या अकाली निधनाने कृत्रिम हृदय विकसित करण्याच्या प्रयत्नातील भारतातला मोठा संशोधक, शास्त्रज्ञ तसेच एक समाजसेवक हरपला आहे.
डॉ. भिडे अवघ्या पन्नास वर्षांचे होते. सारा मित्रपरिवार आणि पेशंटही त्यांना ‘नंदू भिडे’ या नावानेच ओळखत. त्यांचे कृत्रिम हृदय प्राण्यांना बसविण्याचे प्रयोग सुरू होते.