संस्कृत विद्वानांच्या विरळ साखळीतून डॉ. के. रा. जोशी नावाचा दुवा निखळला. अतिशय सामान्य परिस्थितीतून पारंपरिक पद्धतीने संस्कृतचे जिद्दीने शिक्षण घेणाऱ्या डॉ. के. रा. जोशी यांची संस्कृतप्रसाराची भूमिका इतकी आग्रही होती की, इंग्रजीस विरोध करून अनेकांची नाराजी त्यांनी ओढवून घेतली. मराठी आणि संस्कृत या दोन्ही भाषांना त्यांनी ‘रोजगाराची जोड’ देण्याचा आग्रह राज्य सरकारकडे धरला होता. यासाठी त्यांनी अनेक पत्रव्यवहार केले. संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे, यावर ते शेवटपर्यंत कायम राहिले.
कोणत्याही विषयावर सकारात्मक चर्चा करताना स्वत:ची मते ठामपणे मांडली आणि तेवढय़ाच तन्मयतेने विरोधकांचेही म्हणणे ऐकून घेतले. नागपूर विद्यापीठात अध्यापन करताना पारंपरिकता आणि आधुनिकता असा मार्ग स्वीकारून तब्बल पाच तपे संस्कृत प्रचारासाठी खर्ची घातली. काशीला राहून शास्त्री-पंडितांसोबत परंपरागत अध्ययन केल्यावर तत्त्वज्ञान, व्याकरण आणि वेदाभ्यास यांतच न अडकता शास्त्राभ्यास व ललित साहित्यावरील प्रभुत्वही त्यांनी दाखवून दिले. संस्कृत निबंध, कथा, काव्यनिर्मिती अशी अंगे जोपासताना संस्कृतप्रचुर विद्वत्तापूर्ण वक्तृत्वाने राज्यभरात स्वतंत्र ओळख त्यांनी निर्माण केली. ‘काव्यत्रिदलम’ आणि ‘शास्त्रत्रिदलम’ ग्रंथांमध्ये हुंडय़ासारख्या सामाजिक समस्येचा ऊहापोह त्यांनी संस्कृत साहित्यातून केला. ‘नीलकंठ दीक्षित आणि त्यांची काव्यसंपदा’हे सटीक संपादन त्यांनी केले आणि नद्या, निसर्ग आणि पर्यावरणावर अफाट प्रेम करणाऱ्या के. रा. जोशी यांची संस्कृतातील प्रवासवर्णने वेड लावणारी आहेत. संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हावी, हा आग्रह धरताना त्यांनी आदर्शवादाची पाठराखण केली. या ध्येयसिद्धीच्या मार्गावर चालताना लढवय्या बाणा दाखवून दिला. राष्ट्रपती पुरस्कार देऊन भारत सरकारने या विद्वानाने संस्कृत भाषेसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेतली. देश-विदेशातील अनेक सन्मान त्यांना लाभले, पण त्याचा गवगवा त्यांनी केला नाही. विदर्भाने देशाला प्रज्ञाभारती डॉ. श्री. भा. वर्णेकर, डॉ. मधुकर आष्टीकर अशी विद्वत्रत्ने दिली; यातील एक महत्त्वाची कडी म्हणजे डॉ. के. रा. जोशी होते. आज तिन्ही रत्ने निखळली आहेत. त्यांनी जोपासलेल्या शैलीची छाप भविष्यातही कायम राहणार आहे.
------------------------------------------------------------------------------------
डॉ. के. रा. जोशी
एखादे ध्येय घेऊन जगणे , त्यासाठी अवघे आयुष्य समर्पित करणे ही सोपी बाब नाही . त्यासाठी साधना लागते . प्रख्यात संस्कृत पंडित डॉ . केशव रामराव जोशी हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण होते . अमेरिकेच्या बायोग्राफिकल इन्स्टिट्यूटने २००५ साली ' मॅन ऑफ द इयर ' पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान त्यांच्या निवासस्थानी जाऊन केला होता , यावरून त्यांच्या कार्याची केवढी मोठी दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली ते लक्षात यावे . नागपूरच्या संस्कृत भाषा प्रचारिणी सभेचे अनेक वर्ष उपाध्यक्ष राहिलेले जोशी यांच्या कार्याचा अनेकांनी गौरव केला . त्यांना अनेक मानसन्मान मिळाले . जोशी संस्कृतचे विद्वान होते . त्यांचा प्राचीन , अर्वाचीन परंपराचा अभ्यास होता . विपरीत परिस्थितीतून वर आलेल्या जोशी यांनी स्वतःचे व्यक्तिमत्त्व स्वतःच घडवले . त्यंानी नागपूर विद्यापीठातून एम . ए . केले व त्यानंतर पीएच . डी . केले . बिंझाणी कॉलेजात काही काळ प्राध्यापकी केल्यानंतर त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे प्रमुख म्हणून काम केले . विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यासमंडळाचे ते काही काळ अध्यक्ष होते . कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवरही ते सदस्य होते . अतिशय विनोदी स्वभावाचे डॉ . जोशी शाब्दिक कोट्या करायचे . हातात घेतलेले काम तडीस नेणे हा त्यांचा स्वभाव होता . जोशी यांचे व्यक्तिमत्त्व मेहनती , जिद्दी व लढाऊ होते . त्यांनी शारीरिक भाष्यावरील विश्लेषण , अभिनवम् शास्त्रत्रिदलम् या पुस्तकांसह नीलकंठविजयम् व रहस्यमयी या नाटिकाही लिहिल्या . कम्प्युटर ज्या लॉजिकवर चालतो त्या ' लॉजिक ' वर आधारित त्यांचे पुस्तक ' न्यायसिद्धांत मुक्तावली ' खूपच गाजले . त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना पीएच . डी . साठी मार्गदर्शन केले . कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . पंकज चांदे , प्रभाकर आग्रे , डॉ . सुनीती आफळे , हर्षिदा दवे , डॉ . अनुपमा डोंगरे असे अनेक विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनात घडले , मोठे झाले . डॉ . जोशी यांच्या कार्याची दखल घेत १९८९मध्ये त्यांना महाराष्ट्र सरकारने संस्कृत पंडित पुरस्कार प्रदान केला . ज्ञान प्रबोधिनी पुणे , कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ , देवदेवेश्वर संस्थान , जयपूरची संस्कृत सेवा परिषद , श्रुंगेरी पीठ आदींचेही पुरस्कार त्यांना मिळाले . २००९ साली त्यंाना राष्ट्रपती मिळाला . साहित्याचार्य , काव्यतीर्थ , साहित्योत्तम आणि संपूर्णदर्शनमध्यमा अशा अनेक पदव्या त्यांना मिळाल्या . संस्कृत भाषेचा अभ्यास करणारे तरुण मध्यभारतात भरपूर आहेत पण ज्येष्ठ व विद्वान मंडळीची संख्या फार कमी आहे . त्यामुळे संस्कृत पंडित , साहित्याचार्य डॉ . जोशी यांचे महत्त्व संस्कृतभाषिकांना अधिक होते . त्यांच्या अचानक निधनाने संस्कृत साहित्याची फार मोठी हानी झाली आहे .
मूळ स्त्रोत - (महाराष्ट्र टाईम्स)
जोशी, के. रा.
संस्कृत विद्वानांच्या विरळ साखळीतून डॉ. के. रा. जोशी नावाचा दुवा निखळला. अतिशय सामान्य परिस्थितीतून पारंपरिक पद्धतीने संस्कृतचे जिद्दीने शिक्षण घेणाऱ्या डॉ. के. रा. जोशी यांची संस्कृतप्रसाराची भूमिका इतकी आग्रही होती की, इंग्रजीस विरोध करून अनेकांची नाराजी त्यांनी ओढवून घेतली. मराठी आणि संस्कृत या दोन्ही भाषांना त्यांनी ‘रोजगाराची जोड’ देण्याचा आग्रह राज्य सरकारकडे धरला होता. यासाठी त्यांनी अनेक पत्रव्यवहार केले. संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे, यावर ते शेवटपर्यंत कायम राहिले.
कोणत्याही विषयावर सकारात्मक चर्चा करताना स्वत:ची मते ठामपणे मांडली आणि तेवढय़ाच तन्मयतेने विरोधकांचेही म्हणणे ऐकून घेतले. नागपूर विद्यापीठात अध्यापन करताना पारंपरिकता आणि आधुनिकता असा मार्ग स्वीकारून तब्बल पाच तपे संस्कृत प्रचारासाठी खर्ची घातली. काशीला राहून शास्त्री-पंडितांसोबत परंपरागत अध्ययन केल्यावर तत्त्वज्ञान, व्याकरण आणि वेदाभ्यास यांतच न अडकता शास्त्राभ्यास व ललित साहित्यावरील प्रभुत्वही त्यांनी दाखवून दिले. संस्कृत निबंध, कथा, काव्यनिर्मिती अशी अंगे जोपासताना संस्कृतप्रचुर विद्वत्तापूर्ण वक्तृत्वाने राज्यभरात स्वतंत्र ओळख त्यांनी निर्माण केली. ‘काव्यत्रिदलम’ आणि ‘शास्त्रत्रिदलम’ ग्रंथांमध्ये हुंडय़ासारख्या सामाजिक समस्येचा ऊहापोह त्यांनी संस्कृत साहित्यातून केला. ‘नीलकंठ दीक्षित आणि त्यांची काव्यसंपदा’हे सटीक संपादन त्यांनी केले आणि नद्या, निसर्ग आणि पर्यावरणावर अफाट प्रेम करणाऱ्या के. रा. जोशी यांची संस्कृतातील प्रवासवर्णने वेड लावणारी आहेत. संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हावी, हा आग्रह धरताना त्यांनी आदर्शवादाची पाठराखण केली. या ध्येयसिद्धीच्या मार्गावर चालताना लढवय्या बाणा दाखवून दिला. राष्ट्रपती पुरस्कार देऊन भारत सरकारने या विद्वानाने संस्कृत भाषेसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेतली. देश-विदेशातील अनेक सन्मान त्यांना लाभले, पण त्याचा गवगवा त्यांनी केला नाही. विदर्भाने देशाला प्रज्ञाभारती डॉ. श्री. भा. वर्णेकर, डॉ. मधुकर आष्टीकर अशी विद्वत्रत्ने दिली; यातील एक महत्त्वाची कडी म्हणजे डॉ. के. रा. जोशी होते. आज तिन्ही रत्ने निखळली आहेत. त्यांनी जोपासलेल्या शैलीची छाप भविष्यातही कायम राहणार आहे.
————————————————————————————
डॉ. के. रा. जोशी
एखादे ध्येय घेऊन जगणे , त्यासाठी अवघे आयुष्य समर्पित करणे ही सोपी बाब नाही . त्यासाठी साधना लागते . प्रख्यात संस्कृत पंडित डॉ . केशव रामराव जोशी हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण होते . अमेरिकेच्या बायोग्राफिकल इन्स्टिट्यूटने २००५ साली ‘ मॅन ऑफ द इयर ‘ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान त्यांच्या निवासस्थानी जाऊन केला होता , यावरून त्यांच्या कार्याची केवढी मोठी दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली ते लक्षात यावे . नागपूरच्या संस्कृत भाषा प्रचारिणी सभेचे अनेक वर्ष उपाध्यक्ष राहिलेले जोशी यांच्या कार्याचा अनेकांनी गौरव केला . त्यांना अनेक मानसन्मान मिळाले . जोशी संस्कृतचे विद्वान होते . त्यांचा प्राचीन , अर्वाचीन परंपराचा अभ्यास होता . विपरीत परिस्थितीतून वर आलेल्या जोशी यांनी स्वतःचे व्यक्तिमत्त्व स्वतःच घडवले . त्यंानी नागपूर विद्यापीठातून एम . ए . केले व त्यानंतर पीएच . डी . केले . बिंझाणी कॉलेजात काही काळ प्राध्यापकी केल्यानंतर त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे प्रमुख म्हणून काम केले . विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यासमंडळाचे ते काही काळ अध्यक्ष होते . कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवरही ते सदस्य होते . अतिशय विनोदी स्वभावाचे डॉ . जोशी शाब्दिक कोट्या करायचे . हातात घेतलेले काम तडीस नेणे हा त्यांचा स्वभाव होता . जोशी यांचे व्यक्तिमत्त्व मेहनती , जिद्दी व लढाऊ होते . त्यांनी शारीरिक भाष्यावरील विश्लेषण , अभिनवम् शास्त्रत्रिदलम् या पुस्तकांसह नीलकंठविजयम् व रहस्यमयी या नाटिकाही लिहिल्या . कम्प्युटर ज्या लॉजिकवर चालतो त्या ‘ लॉजिक ‘ वर आधारित त्यांचे पुस्तक ‘ न्यायसिद्धांत मुक्तावली ‘ खूपच गाजले . त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना पीएच . डी . साठी मार्गदर्शन केले . कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . पंकज चांदे , प्रभाकर आग्रे , डॉ . सुनीती आफळे , हर्षिदा दवे , डॉ . अनुपमा डोंगरे असे अनेक विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनात घडले , मोठे झाले . डॉ . जोशी यांच्या कार्याची दखल घेत १९८९मध्ये त्यांना महाराष्ट्र सरकारने संस्कृत पंडित पुरस्कार प्रदान केला . ज्ञान प्रबोधिनी पुणे , कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ , देवदेवेश्वर संस्थान , जयपूरची संस्कृत सेवा परिषद , श्रुंगेरी पीठ आदींचेही पुरस्कार त्यांना मिळाले . २००९ साली त्यंाना राष्ट्रपती मिळाला . साहित्याचार्य , काव्यतीर्थ , साहित्योत्तम आणि संपूर्णदर्शनमध्यमा अशा अनेक पदव्या त्यांना मिळाल्या . संस्कृत भाषेचा अभ्यास करणारे तरुण मध्यभारतात भरपूर आहेत पण ज्येष्ठ व विद्वान मंडळीची संख्या फार कमी आहे . त्यामुळे संस्कृत पंडित , साहित्याचार्य डॉ . जोशी यांचे महत्त्व संस्कृतभाषिकांना अधिक होते . त्यांच्या अचानक निधनाने संस्कृत साहित्याची फार मोठी हानी झाली आहे .