चंद्रकांत देवताले

अब मुद्दत बाद सुना है की दिन रात लिख रहा है

संभालकर- चिडीयों के जवाब, खोल दिया है उसने बीचोंबीच आकाश के, मँझरात एक डाकघर
हिंदीतील ज्येष्ठ कवी चंद्रकांत देवताले यांच्या ‘पत्थर फेंक रहा हू’ या गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहातील ही कविता त्यांच्या प्रतिभेचा आणि अनोख्या प्रतिमा योजनांचा अविष्कार घडवते.

अन्य भाषांतील दर्जेदार साहित्याचा मराठी अनुवाद करण्याची परंपरा काही वर्षांत ‘पॉप्युलर’ झाल्याने मराठी रसिकांनी देवतालेंच्या प्रतिभेची केव्हाच दखल घेतली आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा ‘कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार’ देवतालेंना शनिवारी नाशिकमध्ये देण्यात आला. त्यापूर्वी हिंदीतील ज्येष्ठ कवींनी एकत्र येऊन सुरू केलेला पहिला ‘कविता समय’ हा पुरस्कारही त्यांना देण्यात आला. वयाची पंच्याहत्तरी गाठलेल्या देवतालेंना आजवर अनेक पुरस्कार लाभले आहेत. मात्र हे पुरस्कार त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाचे आहेत.

भूखंड तप रहा है, पत्थर की बेंच, इतनी पत्थर रोशनी आदी ११ काव्यसंग्रह गाठीशी असणाऱ्या या कवीला सन्मानित करावे, असे साहित्य अकादमीला अद्याप वाटले नाही. हा कवी खरं तर ज्ञानपीठ पुरस्काराच्या योग्यतेचा. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सीमेवरील जौसखेडा येथे जन्म झालेले देवताले मराठीला मावशीची बोली मानतात. मराठी कवितेतील नवे-जुने प्रवाह त्यांना ज्ञात आहेत. नामदेव ढसाळ, चंद्रकांत पाटील आणि कै. दिलीप चित्रे यांच्याशी त्यांची घनिष्ठ मैत्री. त्यामुळेच चित्रेंच्या काही कविता त्यांनी हिंदीत नेल्या तर देवतालेंच्या कविता चंद्रकांत पाटील यांनी ‘तिची स्वप्ने’ या काव्यसंग्रहाद्वारे मराठीत अनुवादीत केल्या आहेत. हे कमी म्हणून देवताले यांनी संत तुकारामांच्या दीड एकशे अभंगांचा अनुवाद हिंदीत येऊ घातला आहे.

मराठीशी असलेल्या या जवळीकीमुळे चव्हाण विद्यापीठाने केलेला गौरव देवतालेंना सुखावून गेला असेल. शासकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यपदावरून निवृत्त झालेला हा कवी डाव्या विचारसरणीशी बांधिलकी मानतो. स्त्रीच्या विविध भूमिका-नाती आणि प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करणारा सर्वसामान्य माणूस देवतालेंच्या कवितांच्या केंद्रस्थानी असतो आणि म्हणूनच त्यांचा हात आजही लिहीता आहे. हिंदीतील शीर्षस्थ कवी गजानन माधव मुक्तीबोध यांना केवळ गुरूस्थानी न मानता त्यांच्या काव्यावर पीएचडी करण्याची कामगिरी देवतालेंनी केली आहे.

आधुनिकतेच्या रेटय़ात हरवत चाललेला साधेपणा या कवीला अस्वस्थ करतो आणि त्यामुळेच ते तुमच्या-आमच्यातील होऊन जातात. शासकीय महाविद्यालयामध्ये प्राध्यापकीपासून प्राचार्यपदाचा अनुभव घेतलेल्या या कविचे सभोवतालच्या सामाजिक बदलांबाबत अखंड चिंतन सुरू असते. या चिंतनाला उपजत प्रतिभेची जोड मिळते आणि अस्वस्थ करणाऱ्या शब्दांच्या लडी उलगडत जातात. या चिंतनामुळेच वयाच्या या टप्प्यावरही त्यांची सृजनशीलता अखंडपणे टिकून आहे. याच अस्वस्थतेमुळे लेखणी म्यान करून वयाच्या ज्येष्ठतेची साथ घेऊन मोठेपणा वसूल करणे त्यांना मान्य नाही. विचार ठासून मांडणारे विचारवंत व्यक्तीगत पातळीवर दांभिकही असतात.

आत्मपरिक्षणाचे त्यांना वावडे असते. देवताले मात्र स्वत:ला ही संधीही देत नाहीत. सर्वसामान्य माणूस सर्वार्थाने सबल होण्याचे स्वप्न पहाणाऱ्या या कवीला याच सर्वसामान्यांपासून आपण लांब गेल्याची जाणीव आहे, हे त्यांचे वेगळेपण!

Author