पहिल्यापासून चित्रावर एस. फडणीस अशी इंग्रजी अक्षरे नोंदवणाऱ्या शि. द. फडणीस यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन जेव्हा इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ कार्टूनिस्टने बंगलोर येथे भरवले, तेव्हा ते मराठी आहेत की नाहीत, याचा तपास करण्याची गरज तेथील रसिकांना वाटली नाही. त्यांनी ती चित्रे मनापासून पाहिली आणि त्यांना दाद दिली. तसे पाहिले तर शिदंना व्यंगचित्रकार व्हायचेच नव्हते.
१९४४ साली जेव्हा ते मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल झाले, तेव्हा त्यांनी ‘कमर्शिअल आर्ट’ हा अभ्यासक्रम निवडला होता. चित्रकलेतील व्यावसायिकता जाणून त्यामध्येच करिअर करण्याची त्यांची इच्छा होती. दीनानाथ दलाल यांच्यासारख्या त्या काळातील चित्रकाराची मुद्रा मनावर असली, तरीही आपल्याला काही वेगळे करायचे आहे, असे न ठरवता फडणीस व्यंगचित्रकार झाले. १९४५ पासून व्यंगचित्रे काढताना ती नि:शब्द असतील, याची काळजी त्यांनी घेतली. केवळ रंग, रेषा आणि परिसर याच्या आधारे मानवी स्वभावातील विनोद त्यांना दिसू लागला. हौसेहौसेने तेव्हापासून सुरू झालेल्या या व्यंगचित्रकलेचा हीरक महोत्सवही होऊन गेला. तरीही त्यातील ताजेपणा, टवटवीतपणा आणि निर्विषता जराही कमी झाली नाही. फडणीसांच्या चित्रांचे वैशिष्टय़च हे की, नि:शब्द आणि निर्विष विनोदाची पखरण ते आपल्या रंग, रेषांमधून करत राहिले. सुरुवातीच्या काळात काढलेल्या चित्रांना प्रकाशनाची वाट मिळणे अवघड असे. स्वत: उत्तम चित्रकार असलेल्या किलरेस्कर मासिकाचे संपादक शं. वा किलरेस्कर यांनी फडणीसांना प्रथम जगापुढे आणले. त्याच काळात सुरू झालेल्या ‘हंस’ या मासिकाचे संपादक अनंत अंतरकर यांनी आयोजित केलेल्या एका स्पर्धेत शिदंनी पाठवलेल्या व्यंगचित्राला पारितोषिकही मिळाले. चित्राला मिळालेली ही संपादकीय पावती, त्यांच्यासाठी नेहमीच मोलाची ठरली. त्यांना मिळालेल्या ‘हंस’ पुरस्काराने सद्गदित होणे हा त्यांच्यातील कलावंत असण्याचा परिणाम आहे. ज्या काळात पुस्तके केवळ शब्दांसाठीच छापली जायची, त्या काळात फडणीसांनी पुस्तकांना चित्रांचा चेहरा दिला. ती पुस्तके देखणी केली आणि वाचकांना चित्रे वाचायचीही असतात, याची जाणीव करून दिली. एखाद्या जाहिरात संस्थेत आर्ट डायरेक्टर होण्याची शक्यता नाकारून व्यंगचित्रकार म्हणून करिअर करायचे ठरवले, तेव्हा फडणीसांना या कलेतील सर्जनशीलता आणि त्यातील आव्हानांची जाणीव झाली. गेली सहासष्ट वर्षे हा चित्रकार स्वत: काहीही न बोलता आणि चित्रातही शब्द न वापरता गुदगुल्या करतो आहे. जगातल्या कोणत्याही भाषकाला समजणाऱ्या या विनोदाने चित्रकलेतील आणि विनोदातील दालन समृद्ध केले आहे. एरवी सभासमारंभात फार कमी भाग घेणारे फडणीस आपल्या स्टुडिओत असतात, तेव्हा त्यांची सर्जनशीलता त्यांना साद घालत असते. समाजाचे निरीक्षण जेव्हा त्यांच्या कुंचल्यातून व्यक्त होते, तेव्हा पाहणाऱ्याच्या चेहऱ्यावर उमटणारी स्मितरेषा हेच पारितोषिक ठरते. अशा कितीतरी पारितोषिकांचे ते धनी आहेत!
---------------------------------------------------------------------------------------
फडणीस, शिवराम दत्तात्रय
२९ जुलै १९२५
१९२५> “हसरी गॅलरी” हे हास्यचित्रांच स्वतंत्र पुस्तक साकार करुन नर्मविनोदाची नवी रेषा-भाषा घडविणारे ज्येष्ठ चित्रकार शिवराम दत्तात्रेय फडणीस यांचा जन्म. चिमुकली गॅलरी, मिश्किल गॅलरी या संग्रहांसह मुलांसाठी दोन खास पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांचे “रेषाटन” हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. कित्येक मासिके व पुस्तकांची मुखपृष्ठे आतील चित्रे करणार्या फडणीस यांनी काही काळ बालभारतीसाठी गणित विषयाच्या पुस्तकांना (इ.१ ते ४) चित्रांचे नवे परिणाम दिले, हे उल्लेखनीय आहे.

—————————————————————————————