असे जे आपणापाशी असे , जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे , जगाला प्रेम अर्पावे '
साने गुरुजी यांच्या ' खरा तो एकची धर्म ' या कवितेतील या ओळींचा आदर्श ठेवून दत्ता पुराणिक यांनी आपले आयुष्य वेचले . साने गुरुजींच्या विचारांचा प्रसार करण्याचे व्रत त्यांनी घेतले होते . ते त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत पाळले . गुरुजींच्या ' श्यामची आई ' या पुस्तकाच्या वीस हजारांहून अधिक प्रती घरोघरी पोहोचविण्याचा त्यांचा संकल्प गेल्या वर्षीच पूर्ण झाला होता . हा उपक्रम आणखी पाच वर्षे राबविण्याचा मानस त्यांनी त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केला होता . ऐंशीव्या वर्षी असा संकल्प करुन तो तडीस नेण्यासाठी अविरत काम करणार्या पुराणिक यांच्यासारख्या व्यक्ती विरळ्याच ; पण हा संकल्प पूर्ण होण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला . मात्र , तोपर्यंत त्यांनी साने गुरुजींसंबंधातील २५ हजारांपेक्षाही अधिक माहितीपत्रकांचे वाटप आणि सुमारे पाच हजार सीडींची विक्री केली होती .
पुराणिक मूळचे अमळनेरचे . १९५० मध्ये ते पुण्यात वास्तव्यास आले . साने गुरुजींचा सहवास त्यांना लाभला होता . शाळेसमोरून जाताना गुरुजी रोज विचारपूस करीत , अशी आठवण ते नेहमी सांगत . इंग्रजांच्या जाचामुळे गुरुजी काही काळ भूमिगत झाले होते . त्यावेळी त्यांची सेवा पुराणिक यांनी केली होती . त्यांचे सारे जीवनच साने गुरुजीमय झाले होते . ' श्यामची आई ' या पुस्तकाने कित्येक पिढ्या घडवल्या . आपल्या खडतर बालपणाची कहाणी सांगत आणि संवेदनशील भावविश्व उलगडत त्यावेळच्या समाजजीवनाचे चित्रण गुरुजींनी या पुस्तकात केले होते . या पुस्तकाची ओळख आणि त्याद्वारे गुरुजींच्या विचारांचा प्रसार व्हावा यासाठी हे पुस्तक पुराणिक यांनी घराघरात पोहोचविले . या पुस्तकावर ते कथाकथनही करीत असत . इंदूर येथे २००९ मध्ये झालेल्या मध्य प्रदेश मराठी साहित्य संमेलनात त्यांच्या कथाकथनाच्या कार्यक्रमाला रसिकांची दाद मिळाली होती . ' संगम रंगभूमी ' च्या माध्यमातून त्यांनी बालनाट्येही बसविली होती . पुणेकरांनी त्यांच्या या कार्याची कृतज्ञता त्यांचा सत्कार करून वेळोवेळी व्यक्त केली होती . ' हा माझा सत्कार नसून प्रत्येक आईचा सन्मान आहे ,' अशी विनम्र भावना त्यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केली होती . व्यक्तिस्वातंत्र्याच्या अतिरेकाकडे जात असलेल्या आजच्या काळात प्रत्येकालाच गरज आहे , ती साने गुरुजींची आणि त्यांचे विचार घराघरांत पोहोचविणार्या पुराणिक यांचीही.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
-----------------------------------------------------------------------------------
साने गुरूजींनी आपल्या संस्कारपुर्ण पुस्तकांमधून स्वातंत्र्यपुर्व भारताची पिढी घडविली होती, मातृप्रेमाने पावन झालेले अमृत, अक्षररूपांनी त्यांनी महाराष्ट्राच्या साहित्यगंगेमध्ये रूजविले होते. अशा महान साने गुरूजींचे अजरामर साहित्य दीर्घकाळाकरिता जीवंत व तजेलदार ठेविण्याची जबाबदारी अमळनेरच्या दत्ता पुराणिकांनी स्वीकारली. साने गुरूजींचा सहवास त्यांना लाभला होता. साने गुरूजींच्या विचारांनी, व त्यांच्या पुस्तकांमधून वेळोवेळी दिसून आलेल्या देशाबद्दलच्या तळमळीने तसेच काळजीने प्रेरित होवून पुराणिकांनी त्यांचे सर्व साहित्य, व ग्रंथसंपदा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी अजून व्यापक स्वरूपात पोहोचावी याकरिता आपले जीवन समर्पित केले. गुरूजींच्या श्यामची आई ह्या मातेची थोरवी पटवून देणार्या, व हरवत चाललेल्या मातृप्रेमाला साद घालणार्या अप्रतिम पुस्तकाची आजच्या पिढीला नितांत गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी या पुस्तकाच्या वीस हजारांहून अधिक प्रती घरोघरी पोहोचविण्याचा आगळावेगळा संकल्प त्यांनी हाती घेतला. हा संकल्प तडीस नेऊन दाखविताना त्यांनी तब्बल २० हजार पुस्तकांच्या प्रतींचे वाटप, साने गुरूजींसंबंधीच्या २५ हजार माहितीपत्रकांचे वाटप, आणि सुमारे ५ हजार सीडींची विक्री असा मोठा पल्ला पार करून दाखविला. या पुस्तकावर आधारित असलेल्या कथाकथनांची सत्रे आयोजित करणे, हेदेखील त्यांनी गुरूजींच्या विचारमंथनाकरिता निवडलेल विशेष प्रभावी माध्यम होते. उत्तम वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी अशी कित्येक सत्रे यशस्वी करून दाखविली. इंदूर येथे २००९ मध्ये झालेल्या मध्य प्रदेश मराठी साहित्य संमेलनात त्यांच्या कथाकथनाच्या कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फुर्त दाद मिळाली होती. संगम रंगभूमीच्या माध्यमातून त्यांनी अनेक बालनाटये बसविली, व गुरूजींच्या विचारांना विविध कलारूपांत प्रेक्षकासमोर आणले. पुणेकरांनी त्यांच्या या कार्याचा अनेकदा सन्मानाद्वारे व सत्काराद्वारे यथोचित गौरव केला होता. 'हा माझा सत्कार नसून, प्रत्येक आईचा सन्मान आहे', या त्यांनी एका कार्यक्रमा दरम्यान केलेल्या विधानावरून त्यांची विनम्रता झिरपते. वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत त्यांनी गुरूजींच्या विचारांना, तत्वांना व स्वप्नांना सामान्या माणसाच्या स्पंदनांशी जोडण्याचे अतुलनीय कार्य केले. हा उपक्रम आणखी पाच वर्षे पुढे चालू ठेवण्याचा पुराणिकांचा मानस होता. परंतु ही पाच वर्षे उलटण्याअगोदरच ते पंचतत्वांत विलीन झाले.
असे जे आपणापाशी असे , जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे , जगाला प्रेम अर्पावे ‘
साने गुरुजी यांच्या ‘ खरा तो एकची धर्म ‘ या कवितेतील या ओळींचा आदर्श ठेवून दत्ता पुराणिक यांनी आपले आयुष्य वेचले . साने गुरुजींच्या विचारांचा प्रसार करण्याचे व्रत त्यांनी घेतले होते . ते त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत पाळले . गुरुजींच्या ‘ श्यामची आई ‘ या पुस्तकाच्या वीस हजारांहून अधिक प्रती घरोघरी पोहोचविण्याचा त्यांचा संकल्प गेल्या वर्षीच पूर्ण झाला होता . हा उपक्रम आणखी पाच वर्षे राबविण्याचा मानस त्यांनी त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केला होता . ऐंशीव्या वर्षी असा संकल्प करुन तो तडीस नेण्यासाठी अविरत काम करणार्या पुराणिक यांच्यासारख्या व्यक्ती विरळ्याच ; पण हा संकल्प पूर्ण होण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला . मात्र , तोपर्यंत त्यांनी साने गुरुजींसंबंधातील २५ हजारांपेक्षाही अधिक माहितीपत्रकांचे वाटप आणि सुमारे पाच हजार सीडींची विक्री केली होती .
पुराणिक मूळचे अमळनेरचे . १९५० मध्ये ते पुण्यात वास्तव्यास आले . साने गुरुजींचा सहवास त्यांना लाभला होता . शाळेसमोरून जाताना गुरुजी रोज विचारपूस करीत , अशी आठवण ते नेहमी सांगत . इंग्रजांच्या जाचामुळे गुरुजी काही काळ भूमिगत झाले होते . त्यावेळी त्यांची सेवा पुराणिक यांनी केली होती . त्यांचे सारे जीवनच साने गुरुजीमय झाले होते . ‘ श्यामची आई ‘ या पुस्तकाने कित्येक पिढ्या घडवल्या . आपल्या खडतर बालपणाची कहाणी सांगत आणि संवेदनशील भावविश्व उलगडत त्यावेळच्या समाजजीवनाचे चित्रण गुरुजींनी या पुस्तकात केले होते . या पुस्तकाची ओळख आणि त्याद्वारे गुरुजींच्या विचारांचा प्रसार व्हावा यासाठी हे पुस्तक पुराणिक यांनी घराघरात पोहोचविले . या पुस्तकावर ते कथाकथनही करीत असत . इंदूर येथे २००९ मध्ये झालेल्या मध्य प्रदेश मराठी साहित्य संमेलनात त्यांच्या कथाकथनाच्या कार्यक्रमाला रसिकांची दाद मिळाली होती . ‘ संगम रंगभूमी ‘ च्या माध्यमातून त्यांनी बालनाट्येही बसविली होती . पुणेकरांनी त्यांच्या या कार्याची कृतज्ञता त्यांचा सत्कार करून वेळोवेळी व्यक्त केली होती . ‘ हा माझा सत्कार नसून प्रत्येक आईचा सन्मान आहे ,’ अशी विनम्र भावना त्यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केली होती . व्यक्तिस्वातंत्र्याच्या अतिरेकाकडे जात असलेल्या आजच्या काळात प्रत्येकालाच गरज आहे , ती साने गुरुजींची आणि त्यांचे विचार घराघरांत पोहोचविणार्या पुराणिक यांचीही.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
———————————————————————————–
साने गुरूजींनी आपल्या संस्कारपुर्ण पुस्तकांमधून स्वातंत्र्यपुर्व भारताची पिढी घडविली होती, मातृप्रेमाने पावन झालेले अमृत, अक्षररूपांनी त्यांनी महाराष्ट्राच्या साहित्यगंगेमध्ये रूजविले होते. अशा महान साने गुरूजींचे अजरामर साहित्य दीर्घकाळाकरिता जीवंत व तजेलदार ठेविण्याची जबाबदारी अमळनेरच्या दत्ता पुराणिकांनी स्वीकारली. साने गुरूजींचा सहवास त्यांना लाभला होता. साने गुरूजींच्या विचारांनी, व त्यांच्या पुस्तकांमधून वेळोवेळी दिसून आलेल्या देशाबद्दलच्या तळमळीने तसेच काळजीने प्रेरित होवून पुराणिकांनी त्यांचे सर्व साहित्य, व ग्रंथसंपदा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी अजून व्यापक स्वरूपात पोहोचावी याकरिता आपले जीवन समर्पित केले. गुरूजींच्या श्यामची आई ह्या मातेची थोरवी पटवून देणार्या, व हरवत चाललेल्या मातृप्रेमाला साद घालणार्या अप्रतिम पुस्तकाची आजच्या पिढीला नितांत गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी या पुस्तकाच्या वीस हजारांहून अधिक प्रती घरोघरी पोहोचविण्याचा आगळावेगळा संकल्प त्यांनी हाती घेतला. हा संकल्प तडीस नेऊन दाखविताना त्यांनी तब्बल २० हजार पुस्तकांच्या प्रतींचे वाटप, साने गुरूजींसंबंधीच्या २५ हजार माहितीपत्रकांचे वाटप, आणि सुमारे ५ हजार सीडींची विक्री असा मोठा पल्ला पार करून दाखविला. या पुस्तकावर आधारित असलेल्या कथाकथनांची सत्रे आयोजित करणे, हेदेखील त्यांनी गुरूजींच्या विचारमंथनाकरिता निवडलेल विशेष प्रभावी माध्यम होते. उत्तम वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी अशी कित्येक सत्रे यशस्वी करून दाखविली. इंदूर येथे २००९ मध्ये झालेल्या मध्य प्रदेश मराठी साहित्य संमेलनात त्यांच्या कथाकथनाच्या कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फुर्त दाद मिळाली होती. संगम रंगभूमीच्या माध्यमातून त्यांनी अनेक बालनाटये बसविली, व गुरूजींच्या विचारांना विविध कलारूपांत प्रेक्षकासमोर आणले. पुणेकरांनी त्यांच्या या कार्याचा अनेकदा सन्मानाद्वारे व सत्काराद्वारे यथोचित गौरव केला होता. ‘हा माझा सत्कार नसून, प्रत्येक आईचा सन्मान आहे’, या त्यांनी एका कार्यक्रमा दरम्यान केलेल्या विधानावरून त्यांची विनम्रता झिरपते. वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत त्यांनी गुरूजींच्या विचारांना, तत्वांना व स्वप्नांना सामान्या माणसाच्या स्पंदनांशी जोडण्याचे अतुलनीय कार्य केले. हा उपक्रम आणखी पाच वर्षे पुढे चालू ठेवण्याचा पुराणिकांचा मानस होता. परंतु ही पाच वर्षे उलटण्याअगोदरच ते पंचतत्वांत विलीन झाले.