— जगदीश पटवर्धन
Author
Post Views: 11
महाराष्ट्र राज्य निर्मितीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा व अभिनंदन. स्वतंत्र महाराष्ट्र निर्मितीसाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्यांचे स्मरण आपल्या प्रत्येकाला दर वर्षी १मे रोजी होते. परंतू सध्याचे राज्यकर्ते हुतात्म्यांचे बलिदान सार्थकी ठरवून आणि स्मरून साजेशी वागणूक महाराष्ट्रातील जनतेला देतात का ? त्यांच्या प्रश्नांची उकल करतात का ? त्यांच्या प्रश्नांना खरोखरच न्याय मिळतो का ? जर याचे उत्तर ‘होय’ असेल तर हुतात्म्यांच्या आत्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. पण उत्तर ‘नाही’ असेल तर परिस्थिती नक्कीच राजकारणी व जनतेला आत्मचिंतन करणे जरूरीचे ठरेल.
Copyright © 2025 | Marathisrushti