लोक गीतेवर हात ठेउन खोट बोलतात
सत्य वचनी रामाचा जन्मसोहळा करतात
ग॑मत ही पाहून राम हसत असेल मनात
राज्य सोडून एवढ्यासाठीच गेलो का वनात
अहिल्येचा केला उद्धार पण अद्न्यान तसेच
दुश्ट्पणा घालऊ कसा पडलाय पेच
दु:ख दारिद्र्य, भेदभाव बसलेत मान्डुन ठाण
रावन मारला पण निपटू कशी ही घाण?
रामराज्य यावे सर्वचजण म्हणतात
सदाचाराने कुठे कोण वागतात?
या साठी आता एकच उपाय करावा
रामराया तुम्ही मनामनात जन्म घ्यावा
— प्रभा मुळे
Author
Post Views: 12