आपल्या देशाने महासत्ता व्हाव ही प्रत्येक भारतीयाच्या मनातील इच्छा आहे. २०२० पर्यंत इंडिया महासत्ता होईलच. पण भारत महासत्ता होईल का? एकीकडे झपाट्याने बदलणारा इंडियाचा कार्पोरेट चेहरा तर दुसरीकडे ‘जैसे थे’ स्थितीतील ग्रामीण भारत; याला महासत्ता म्हणता येईल का? अनेक खेडी ही समस्यांच्या अंधारात चाचपडत आहेत. अस्वछ्चता, स्थानिक राजकारण, नेतृत्वाचा अभाव, शैक्षणिक सुविधांचा अभाव, स्पर्धा परीक्षांबाबतची उदासीनता, सरकारी कर्मचाऱ्यांची मनमानी, अनिष्ठ चालीतीती या असंख्य अडचणींचा विळखा सुधारणा होऊ देत नाही. खेड्यातील तरुण व सुशिक्षित नागरिक एकत्र आले तर ही स्थिती बदलू शकेन.
ग्रामपंचायतीने आपले जुने कार्यालय ग्रंथालयासाठी व कामकाजासाठी उपलब्ध करून दिले. विविध उपक्रमांना माध्यमिक शाळेतर्फे मोलाचे सहकार्य केले जाते. या विविध उपक्रमांची माहिती व्हावी व बाहेरगावी असलेल्या नागरि ांचे आपल्या गावाकडे लक्ष वेधावे यांसाठी काही इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्यांनी ग्रुपला मोफत वेबसाईट उपलब्ध करून दिली. शिक्षणासाठी व नोकरीसाठी बाहेरगावी असणारे तरुण सुट्ट्यांच्या काळात या उपक्रमांमध्ये आवर्जून सहभागी होतात. महासत्तेच्या दिशेने ह णाऱ्या या प्रयत्नांना सलाम व शुभेच्छा ! संपर्क :