आई नावाची कविता

हात खंगले भंगले
या रानाच्या मातीत
स्वप्न उद्याचे पाहिले
थोर गर्भार रातीत

तुडी चिखल अनोनी
भेगा भिजुनी पायात
पीकं वाढवी उरात
ओढ संसारी राबत

आता माखला संसार
दही हातानं गाडगे
उभा जलम घातला
झाडी संसार वाडगे

तुझ्या चविष्ट हाताची
भूल रूतून राहिली
आई नावाची कविता
मूक होऊन गायली

वाट लेकरांच्या वाटे
डोळे लाऊन पाहते
दिसे रानात लेकरू
थेंब डोळ्यात टिपते

रूपे अनंत दिसती
पाहू जाता मन भरे
कधी आटत नाहीत
मनातील खोल झरे

नाते तुझेच मातीशी
माती तुझीच ऐकते
गावाकडून येताना
दावण ओढ का घेते?

मोती उड्या मारी अंगा
मनी पायाला चाटते
डेऱ्यातील मऊ लोणी
तुझे बोटं पाझरते

-- विठ्ठल जाधव.

शिरूरकासार, जि.बीड



हात खंगले भंगले
या रानाच्या मातीत
स्वप्न उद्याचे पाहिले
थोर गर्भार रातीत

तुडी चिखल अनोनी
भेगा भिजुनी पायात
पीकं वाढवी उरात
ओढ संसारी राबत

आता माखला संसार
दही हातानं गाडगे
उभा जलम घातला
झाडी संसार वाडगे

तुझ्या चविष्ट हाताची
भूल रूतून राहिली
आई नावाची कविता
मूक होऊन गायली

वाट लेकरांच्या वाटे
डोळे लाऊन पाहते
दिसे रानात लेकरू
थेंब डोळ्यात टिपते

रूपे अनंत दिसती
पाहू जाता मन भरे
कधी आटत नाहीत
मनातील खोल झरे

नाते तुझेच मातीशी
माती तुझीच ऐकते
गावाकडून येताना
दावण ओढ का घेते?

मोती उड्या मारी अंगा
मनी पायाला चाटते
डेऱ्यातील मऊ लोणी
तुझे बोटं पाझरते

— विठ्ठल जाधव.

शिरूरकासार, जि.बीड

Author