जीवन…..एक हुरहूर.

जीवन झेप कुठे घेईल,

याची मला हुरहूर आहे......

चार पैशाच्या कर्जापायी,

गाव रान्हं सोडलं आहे.....

गावात शेत छान माझ्या,

पण पैशाची कमी आहे.....

चार पैशाच्या कर्जानं ,

जीवन ओझं झालं आहे.....

स्वार्थाच्या मोही जगात,

सर्वच मला अनोळखी आहे.....

मी फक्त - स्तब्ध,

जग पुढं चाललं आहे.....

पैशाच्या आतुरतेचा,

माणूस गुलाम बनला आहे.....

गरीबाच्या शब्दांना - - जगात..,

मोल फार कमी आहे .....

म्हणूनच.. - - जीवन कुठे झेप घेईल,

याचीच मला हुरहूर आहे.... .

-- गजानन साताप्पा मोहिते



जीवन झेप कुठे घेईल,

याची मला हुरहूर आहे……

चार पैशाच्या कर्जापायी,

गाव रान्हं सोडलं आहे…..

गावात शेत छान माझ्या,

पण पैशाची कमी आहे…..

चार पैशाच्या कर्जानं ,

जीवन ओझं झालं आहे…..

स्वार्थाच्या मोही जगात,

सर्वच मला अनोळखी आहे…..

मी फक्त – स्तब्ध,

जग पुढं चाललं आहे…..

पैशाच्या आतुरतेचा,

माणूस गुलाम बनला आहे…..

गरीबाच्या शब्दांना – – जगात..,

मोल फार कमी आहे …..

म्हणूनच.. – – जीवन कुठे झेप घेईल,

याचीच मला हुरहूर आहे…. .

— गजानन साताप्पा मोहिते

Author