साहित्य - ललित

पत्रप्रपंच – जेष्ठ नागरिकांच्या ‘पत्ररूपी’ मनोव्यवहारांचा परिचय

Category:

 

2017 साली प्रसिद्ध झालेले हे पुस्तक मी वाचले होते आणि मला ते भावले होते. पण ‘कोविद’ १९, च्या महामारीत, माझे , मीच कपाटात ठेवलेल्या पुस्तकाकडे लक्ष गेले. आतुरतेने मी ते पुन्हा उघडले. भावनांचा आणि विचारांचा पूरच माझ्या मनात वाहू लागला. काळाच्या उदरात विलय होऊ पाहणाऱ्या या पुस्तकाला उजेडात आणले तर ‘पत्रे’ लिहिणाऱ्या या ‘सिनिअर’ सिटिझन्स’ना न्याय मिळेल या हेतूने याचे परीक्षण करण्याचा हा ‘प्रपंच’!

  January 12, 2021


साहित्य - ललित

शंकर मुडके!

Category:

 

सकाळचे ते ‘गोल्डन अवर्स’ होते. पहिला चहा झाला होता. लोखंडी गेटच्या बेचक्यात, पेपरवाल्या पोराने खुसून ठेवलेला पेपर, मी काढून घेतला. चारदोन ठिकाणी हुडकल्यावर चष्मा सापडला आणि तो नाकावर चढवून, पेपर पालथा घातला आणि वाचायच्या विचारात होतो. हो, मी पेपर मागच्या पानापासूनच वाचायला सुरुवात करत असतो! “काय? सुरेशअण्णा हैती का घरात?” मी एकदम दचकलोच.

  January 11, 2021


साहित्य - ललित

काही माणसं ” अशीच ” असतात !

Category:

 

” ओ मेरे सनम ——– ” शिवरंजनी मधील ही श्रवणीय रचना कायम लक्षात राहिली आहे ती अनेक कारणांनी ! मोडतोड झालेलं नातं ( गुपित फुटल्यानंतरचं) सांधण्यासाठी वैजयंती सहारा घेते शिवरंजनीचा ! शैलेंद्रचे घायाळ आणि नेमके क्षमायाचना करणारे शब्द ! कधी नव्हे ते शिवरंजनीच्या सुरावटीला सतारीची साथ ( तेथे व्हायोलिन वगैरे अधिक जुळलं असतं कदाचित), वैजयंतीचे नृत्य आणि लताचा स्वर. तिची सुरुवातीची आलापी जीवघेणी आणि येऊ घातलेल्या प्रसंगाचा मूड सेट करणारी.

  January 11, 2021


लेखसंग्रह

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ३९

Category:

 

भगवंताच्या अत्यंत सुकुमार आणि उन्नत अशा कपोल प्रदेशांचे वर्णन केल्यानंतर, आचार्य श्रींची दृष्टी त्या दोन कपोलांच्या मध्ये असणाऱ्या, अत्यंत नयनमनोहर अशा नासिकेवर खिळते. तिच्या सौंदर्याचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,

  January 11, 2021


लेखसंग्रह

शिक्षणाचे मानसशास्त्र : परीक्षार्थी शिक्षण – जमेची बाजू

Category:

 

चीनच्या सुई घराण्याच्या राजवटीने सातव्या शतकात जगातली पहिली सरकारी राजपत्रित (गॅझेटेड) अधिकारी पासून कारकुना पर्यंतच्या भरतीसाठी सार्वजनिक परीक्षा आयोजित केली (आजची IAS, MPSC, UPSC परीक्षा). पाश्चिमात्य देशात एकोणिसाव्या शतकात इंग्लंडमधे शालांत परीक्षा पद्धत राबवली गेली आणि ओघाने भारतातही आली. इतिहास मनोरंजक तर आहेच पण आजही अशाच पद्धतीने राष्ट्र / राज्य प्रशासकीय यंत्रणेची निवड प्रक्रिया अशीच आहे.

  January 10, 2021