Year: 2017
वांशिक संघर्षात होरपळणारा मणिपूर
Category:
लेखसंग्रहमणिपूरमध्ये संयुक्त नागा परिषदेकडून ५२ दिवसांपासून आर्थिक नाकेबंदी सुरू असून, २३/१२/२०१६ ला कामजोंग जिल्ह्यातील तीन सरकारी कार्यालयांना आग लावण्यात आली.मणिपूरमधील आर्थिक नाकाबंदीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी राज्यसभा सदस्य आणि पाच वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या बॉक्सर मेरी कोम यांनी केली आहे. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या नाकाबंदीमुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे.
वीरचक्र विभूषित योद्धा सुभेदार रतन सिंग
Category:
लेखसंग्रहसुभेदार रतन सिंग १० ऑगस्ट, २०१६ रोजी वयाच्या ९२व्या वर्षी वृद्धापकाळाने मरण पावले. आमच्या प्रसारमाध्यमांनी बारीकशी बातमी दिली. साहजिकच आहे. वाचकांच्या मनात थोडीदेखील राष्ट्रीय भावना निर्माण होता कामा नये, असंच आपल्या माध्यमांचं अलिखित धोरण आहे. विविध प्रकारच्या राजकीय, सामाजिक खर्याा-खोट्या ‘कॉन्ट्रोव्हर्सीज’ उभ्या करायच्या आणि लोकांचं चित्र त्यात गुंतवून ठेवायचं; ‘नॉन-इश्यूज’ ना ‘इश्यूज’ बनवायचं आणि खर्याय ‘इश्यूज’ पासून जनतेचं लक्ष दूर न्यायचं, हे खरं अलिखित धोरण आहे.
बांगलादेशी घुसखोरी:२०१६मधल्या महत्वाच्या घटना
Category:
लेखसंग्रहबांगलादेशमधून घुसखोरी करुन भारतात आलेल्या विस्थापितांची संख्या आता 2 कोटींवर पोहचली आहे, अशी माहिती केंद्र शासनाने राज्यसभेत ०१/१२/२०१६ ला दिली. ही संख्या ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्ये एवढी आहे.मात्र ही संख्या ५-६ कोटी असावी.
बीएसएफचे व्यवस्थापन सुधारणे गरजेचे
Category:
लेखसंग्रहसीमा सुरक्षा दलाच्या(बीएसएफच्या) तेजबहादुर या जवानाने सोशल मिडीयावर टाकलेला एक व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने काही गंभीर आरोप केले आहेत. सीमेवरील जवानांना मिळणार्या जेवणाचा दर्जा अतिशय सुमार असतो, त्यांना मिळणार्या सोयीसुविधा पुरेशा नसतात, जवानांसाठी सरकारकडून पुरेसा धान्यसाठा मिळत असला तरीही काही अधिकारी हे धान्य मधल्या मधे विकतात.
संरक्षणक्षेत्र भरीव तरतुदींच्या प्रतिक्षेत
Category:
लेखसंग्रह‘गतवर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये संरक्षणक्षेत्रासाठीची तरतूद ४.८ टक्क्यांनी वाढली होती. गेल्या १० वर्षांतील ही सर्वांत कमी वाढ होती. पाकिस्तानसारखा देश जीडीपीच्या ३.५ ते ४ टक्के पैसे संरक्षण क्षेत्रावर खर्च करतो. चीनचे संरक्षण बजेट हे आपल्या संरक्षण बजेटच्या कमीत कमी तिप्पट आहे. भारताची सध्याची तरतूद जीडीपीच्या दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे.
समस्या रोहिंग्या शरणार्थिंची
Category:
लेखसंग्रहभारतामध्ये 40 हजार रोहिंग्या शरणार्थिं मुसलमान नागरिक रहात असावे अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कमिशनने दिली आहे. यामध्ये 16 हजार 500 रोहिंग्या शरणार्थिंना संयुक्त राष्ट्रांकडून ओळखपत्रही मिळाली आहेत. त्यातील ६ हजार ६८४ हे केवळ जम्मू आणि कश्मीर राज्यातील हिंदूबहुल जम्मू भागात राहतात. परंतु ही आकडेवारी दोन वर्षांपूर्वीची आहे. त्यात भर नक्कीच पडलेली असणार.
महाराष्ट्राची सागरी सुरक्षा आणि सुधारणा
Category:
लेखसंग्रह‘२६/११’च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानातून दहा दहशतवादी हिंदुस्थानी नौदल, तटरक्षक दल, सागरी पोलिसांना चकवून मुंबईत किनाऱ्यावर येऊ शकले. त्यानंतर वर्तमान सागरी सुरक्षा प्रणालीत असलेल्या उणिवा दूर करण्याकरिता अनेक उपाय घोषित केले. या हल्ल्याला उद्या नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे गेल्या नऊ वर्षांनंतर सागरी सुरक्षेत घडून आलेल्या सुधारणांचे विश्लेषण करणे गरजेचे आहे.