शहरे आणि गावे

चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे:

Category:

 

ताडोबा-अंधारी राष्ट्रीय उद्यान (व्याघ्र प्रकल्प) – हे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ आहे. ताडोबा हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. त्याचे एकूण क्षेत्र ११५.१४ चौ. किलोमीटर एवढे आहे. या अरण्यात ‘ताडोबा’ नावाचा आदिवासींचा देव आहे, त्यामुळेच या राष्ट्रीय उद्यानास ‘ताडोबा’ असे नाव देण्यात आले.

  June 22, 2015


शहरे आणि गावे

चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी म्हणतात कारण जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी आहेत. चंद्रपूरमध्ये अनेक चुन्याच्या खाणीदेखील आहेत.

  June 22, 2015


शहरे आणि गावे

चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

प्राचीन काळी चंद्रपूर हा जिल्हा लोकापुरा व त्यानंतर इंद्रपूर या नावांनी ओळखला जात असे. ब्रिटिश राजवटीत व स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे हा जिल्हा ‘चांदा’ या नावाने ओळखला जात होता. १९६४ मध्ये चांदा शहराचे नाव बदलून चंद्रपूर करण्यात आले. चांदा जिल्ह्यासही पुढे ‘चंद्रपूर’ जिल्हा या नावाने ओळखले जाऊ लागले.

  June 22, 2015


शहरे आणि गावे

बुलढाणा जिल्हा

Category:

 

वायव्येकडून व पश्र्चिमेकडून पूर्वेकडे विदर्भात जाताना या जिल्ह्यातून जावे लागते म्हणूनच या जिल्ह्यास ‘विदर्भाचे प्रवेशद्वार’ म्हटले जाते. लोणार या खार्‍या पाण्याच्या अनोख्या महासरोवरामुळे तसंच या भूवैज्ञानिक नवलाईमुळे,बुलढाणा जिल्ह्याचे नाव जागतिक नकाशावर ठळक झाले आहे.

  June 22, 2015


शहरे आणि गावे

बुलढाणा जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

अन्नधान्यांपैकी ज्वारी हे बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असून तूर, भुईमूग, करडई, गहू, हरभरा, कापूस, मिरची, ऊस आणि केळी ही पिके घेतली जातात.

  June 22, 2015


शहरे आणि गावे

बुलढाणा जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

मराठी साहित्यातील एक नाटककार, विनोदी लेखक आणि समीक्षक म्हणून प्रसिध्द असणारे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म बुलढाणा येथे झाला.

  June 22, 2015


शहरे आणि गावे

बुलढाणा जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

बुलढाणा जिल्ह्यातील डोंगराळ भागात महादेव काळी, भिल्ल, पारधी, कोरकू  व निहाल यांसारख्या जमातीचे लोक राहतात. कोरकू व निहाल या जमातींची वस्ती ‘जळगाव-(जामोद)’ या तालुक्यात जास्त आहे. मेहकर व चिखली तालुक्यांत ‘बंजारा’ या भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांची संख्या ही अधिक आहे

  June 22, 2015


शहरे आणि गावे

बुलढाणा जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

बुलढाणा जिल्हा (किंवा बुलडाणा जिल्हा) हा महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागात असून या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९६८० चौ.किमी इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेस अनुक्रमे अकोला जळगाव जालना परभणी हे जिल्हे आहेत.

  June 22, 2015


शहरे आणि गावे

बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

शेगाव येथील श्री.संत गजानन महाराजांचे मंदिर प्रसिद्ध असून येथील आनंदसागर हा बगीचा सुध्दा रमणीय आहे. लोणार येथील उल्कापाताने निर्मिलेले खा-या पाण्याचे सरोवर हे जगप्रसिद्ध आहे. छत्रपती शिवजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे जन्मस्थान जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आहे.

  June 22, 2015