मिक्स परांठा- गाजर+ वाटाणे+ चुकुंदर (बीट)
Category:
खाद्ययात्राहिवाळ्यात भाजी बाजारात गाजर आणि वाटाणे भरपूर असतात. गाजर आणि वाटण्याची कोरडी भाजी मस्तच लागते. पण गेल्या रविवारी सौ. ने विचारले. गाजर, मटर (वाटाणे) घालून उपमा करू का? मी म्हणालो, उपम्याच्या जागी यांचे परांठे केले तर कसे लागतील. सौ.ला ही कल्पना आवडली.
साहित्य: गाजर २५० ग्रम, मटार (वाटाणे) १ वाटी, चुकुंदर(बीट) १ मोठे. , हळद, हिरवी मिरची २, लसूण, अदरक, तिखट २ चमचे (चवीनुसार), गरम मसाला (१ चमचा), कसूरी मेथी (२ चमचे) शिवाय कणिक (किती परांठे बनवायचे, याचा अंदाज घेऊन (आम्ही दिल्लीकर परांठ्यात भरपूर मिश्रण भरतो, मुंबईकर बहुतेक कमी भरतात) मळून घ्यावी. शुद्ध गायीचे तूप किंवा लोणी पराठ्यांवर लावण्या साठी. अदरक, लसूण, हिरवी मिरचीचे पेस्ट करून घ्यावे. मीठ चवीनुसार.
March 3, 2015