पनामा
Category:
शहरे आणि गावेपनामाचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. उत्तर व दक्षिण अमेरिका खंडांना जोडणाऱ्या एका चिंचोळ्या संयोगभूमीवर वसलेल्या पनामाच्या पश्चिमेला कोस्टा रिका, आग्नेयेला कोलंबिया, उत्तरेला कॅरिबियन समुद्र व दक्षिणेला प्रशांत महासागर आहेत. पनामा सिटी ही पनामाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.