उणा आनंद…….
Category:
कथा साहित्य - ललित
December 14, 2022
Category:
कथा साहित्य - ललित
December 14, 2022
Category:
कथा साहित्य - ललितविजय हातातील पेपर सोफ्यावर टाकत उठला आणि दरवाज्याच्या दिशेने चालू लागला त्याने हळूच दरवाजा उघडला तर दरवाजात एक सुंदर स्त्री उभी होती…
December 14, 2022
Category:
कथा साहित्य - ललितग्रामीण भागामध्ये दिवाळी हा सण अतिशय महत्त्वाचा असा आहे. वर्षातील बारा महिन्यांपैकी हा महत्वपूर्ण दिवाळी सण या सणाला गोड गोड खाण्याची मज्जा व खारट चिवडा. प्रत्येकाच्या जिभेला चव देणारा हा चिवडा कायम आठवणीत राहणारा असा आहे. शहरातील दिवाळीपेक्षा ग्रामीण भागातील दिवाळी अतिशय मजेशीर अशी असते. ग्रामीण भागातील नवीन लग्न झालेल्या मुली नागपंचमी गवर गणपती व दिवाळी या सणावर खास करून माहेरी येत असतात. नवीन लग्न झालेल्या मुली यांचा विषय अतिशय रंगेल असा असतो. कार्तिक महिन्यातील दिवाळी दिवाळ काढून गेली तरी आठवण मात्र कायम प्रत्येकाच्या स्मरणात राहते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
December 14, 2022
Category:
कथा साहित्य - ललित
December 12, 2022
Category:
कथा साहित्य - ललित
December 8, 2022
Category:
कथा साहित्य - ललित
December 3, 2022
Category:
कथा साहित्य - ललितमी शाळेत शिकायला असताना अनेक गोष्टी मी पाहिल्या आहेत. खरंतर मराठी शाळेमध्ये शिकायला मला फार आनंद वाटत असे. वर्गामध्ये भिताडवर रंगीबिरंगी लावलेले सुरेख अक्षरातील तकते वेगवेगळी काढलेली सुरेख चित्रे. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सुरेख देखावा पुन्हा पुन्हा पहावा व या चित्रावर ती काहीतरी लिहावे असे माझ्या मनाला नेहमी वाटत होते. त्यातील काही म्हणी अजून आठवतात खत देऊन जाते,गोत देऊन जाते, हातच्या काकणाला आरसा कशाला, अशा अनेक म्हणी प्रत्येक वर्गाच्या भिताडावर सुरेख अक्षरांमध्ये लिहिलेल्या दिसत होत्या. वर्गातील शिक्षक मुले व मुली शिस्तीचे पालन करीत होते खाकी हाफ शर्ट पांढऱ्या रंगाचा हाफ शर्ट व डोकीला पांढरीशुभ्र टोपी. काखेत अडकवलेलं शाळेचे दप्तर घेऊन मी शेतातून चिखल तुडवित शाळेला रोज जात असे. मराठी शाळा म्हणजे एक ज्ञान मंदिर याच ज्ञान मंदिरात ज्ञानाची पूजा केली जात होती. पूर्वीचे मास्तर विद्यार्थ्याला कळेपर्यंत शिकवत होते एखाद्यावेळी प्रश्नाचे उत्तर नाही आले तर छडीने मारत होते.
September 28, 2022
Category:
कथा साहित्य - ललितरेल्वे मध्ये कामाला लागण्या अगोदर मी बिगारी काम दुसऱ्याच्या शेतामध्ये करीत होतो. त्यात वडील वारलेले घरामध्ये पैशाची चणचण फार भासत होती.वडीलतरी या जगातून निघून गेले घर रिकामे झाले वडिलांचा आधार नाहीसा झाला. गेली कित्येक दिवस वडील अंथरुणावर पडून होते आधार होता तो आधार नाहीसा झाल्यामुळे. अखंड घर दुःखात बुडाले होते घरात मला अजिबात करमत नव्हते. सोबत घरातील चारी भिंती मला खायला उठल्या होत्या. घरा मध्ये लाईट नाही दिव्याच्या मीन मिनित प्रकाशात मला काही सुचत नव्हते. वडील आजारी असल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत दोन मामानी केलेली मदत मला डोंगराएवढी वाटत होतं. या जगामध्ये कुठेतरी देव आहे आणि तो देव मामाच्या रूपाने आम्हाला मदत करीत आहे हे मला जाणवत होते. परंतु आम्ही लहान होतो त्यांचे डोंगराएवढे माझ्यासारख्या कमी वयाच्या मुलाला न पिलं न्या सारखे नव्हते. यांची परतफेड कशी करायची हा विचार माझ्या मनामध्ये राहून राहून येत होता. उपकाराचे ओझे कर्ज पेक्षा फार मोठे आहे हे मला जाणवत होते परंतु विलाज नाही आलेल्या दिवसाला तोंड देणे एवढेच बाकी होते. माझे वय कमी मला शेतीकामाला कोण देईल का हा विचार मी मनात करीत होतो. माझी आई शिंदे अण्णांच्या द्राक्ष बागेमध्ये काम करत होती मी ही शिदे अण्णांच्या द्राक्ष बागेमध्ये कामाला जावे असा मी मनामध्ये विचार केला. नाचार आला म्हणून विचार सोडू नये हे माझ्या आईचे वाक्य आहे मी मनाचा निर्णय केला आणि अण्णांच्या बागेमध्ये कामाला गेलो. हे काम करीत असताना मला काम करणारे सारे सौंगडी भेटले त्यामध्ये अशोक शिंदे. शिवाजी शिंदे गणपत शिंदे भीमा मामा अशी मंडळी मला भेटली. आमच्या घरची परिस्थिती पाहून या माणसानी प्रत्येक वेळी मला कामांमध्ये सांभाळून घेतले…।
September 27, 2022
Category:
कथा साहित्य - ललितअशा बैलगाड्या पाहिल्या की पूर्वीची आठवण येते पूर्वी वाहने फार कमी होती. बैलगाडी किंवा सायकल असे प्रवासाचे साधन असायचे. पूर्वीची बैलगाडी व गाडीला झुंपलेली दोन बौले त्यांच्या अंगावर टाकलेले रेशमी वस्त्राचे. रंगीबेरंगी आरशाने नटलेले बैलाच्या अंगावरील झूल अतिशय सुंदर दिसायचे. गाडीत बसलेला शेतकरी त्याच्या डोक्याला बांधलेला टावेल. दोन हातात बैलांची कासरी चाबूक पाठीमागे बैलगाडी मध्ये बसलेली. लहान मुले आणि गाडीच्या पाठीमागून धावत येणारा कुत्रा ही सारी आठवण येते. लोककवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या गीतातून समाजात वावरणाऱ्या अनेक लोकांचे वर्णन चांगल्या पद्धतीने लिहिले आहे. पूर्वी लोक संगीतामध्ये अनेक जुनी गाणी संगीतात कंपोज करून समाजाला ऐकवली आहेत. पूर्वी कर्मणुकीची साधने अतिशय कमी प्रमाणात होती ग्रामीण भागामध्ये भजन सोंगी भजन ठराविक गावांमध्ये नाट्य संस्था. तमाशा आणि तमाशामध्ये सादर होणारे पौराणिक किंवा सामाजिक वग नाट्य. त्याकाळी भेदिक सुद्धा होते परंतु पूर्वी लोकसंगीत लिहिणारे लोककवी यांनी अनेक चांगली गाणी समाजाला ऐकवली आहेत. ती लिहिलेली गाणी पुन्हा पुन्हा कानावरून गेली म्हणजे एक प्रकारचं नवल वाटते. त्या गाण्यांमध्ये निसर्ग वर्णन बैलगाडी व बैलाचे वर्णन नात्यातील माणसांची गाणी ही राहून राहून आठवतात उदाहरणार्थ सखुबाई सखुबाईगं, तुझा नवरा बोलाव तुयागं, तंबाखू बिंबाखू खात असलं, डब्बी त्याला घावत नसंल, जा जा येत नाही म्हणून सांग. किंवा नाही खेळणार मुंबई मटका, वामनदादा कर्डक यांनी विविध विषयावर लेखन केले आहे हे प्रामुख्यात जाणवते. भिमाई रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश पडणारी कितीतरी गाणी ऐकावयास मिळतात….।
September 26, 2022
Category:
कथा साहित्य - ललितगिरिजाआत्या अणि तिचे यजमान रत्नाकर. आम्ही त्यांना काकाच म्हणायचो. दोघांचा संसार तसा वाढलेल्या वयावरच सुरू झाला. रत्नाकर आपल्या लग्नाचं वय उलटुन गेलेल्या बहिणीसाठी थांबून राहिले होते आणि गिरीजाआत्याचं लग्न जुळत नव्हतं म्हणून ती बिनलग्नाची राहिली होती. गंमत म्हणजे काही वर्षांपूर्वी हे प्रपोजल दोघांच्याही समोर आलं होतं. परंतू प्रत्येक गोष्ट घडण्याची नियतीने एक वेळ निश्चित केलेली असते. आपल्या बहिणीसाठी रत्नाकरनी त्यावेळी या लग्नाला नकार दिला. अखेर बहिणही अविवाहित राहूनच स्वर्गवासी झाली. परंतू गिरीजाआत्या आणि रत्नाकरकरकाकांचं लग्न मात्र ती हयात असतानाच झालं. यालाच म्हणतात नियतीचा खेळ.
September 16, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti