लेखसंग्रह

आडनावाचा वारसा

Category:

 

कुटुंबाला आणि पर्यायाने व्यक्तीला आडनाव असतेच असते. ही प्रथा जवळजवळ सर्वच देशात पाळली जाते. मराठी समाजही अपवाद नाही. आनुवंशिकतेचे साधर्म्य दर्शविण्यासाठी, कुटुंबांच्या आडनावांची प्रथा, मुळात रूढ झाली असावी. परंतू कालांतराने या प्रथेचा गैरवापर होअून विचित्र, विक्षिप्त, लाजिरवाणी, भयानक आणि हास्यास्पद आडनावे निर्माण झाली आणि ती पिढ्यानपिढ्या चालूही राहिली.

लेखसंग्रह

जात म्हणजे काय? ….. बदलता दृष्टीकोन

Category:

 

तुमचा वंश, तुमचं कुळ यालाच तुमची ‘जात’ असं म्हटलं जातं. जी जात नाही ती ‘जात’ असंही म्हणतात. भारतात, जातीसंस्था ही फार पुरातन काळापासून अस्तित्वात आहे. वर्ण आणि जाती या संकल्पना, वास्तविक चांगल्या अुद्देशानं समाजात रूढ झाल्या. जन्मत:च तुम्ही आपल्या बरोबर जे जे गुणावगुण घेअून येता ते तुमचं ‘जात’ (तुमची ‘जात’ नव्हे). जन या संस्कृत क्रियापदापासून जनन, जनता, जन्म, जात हे शब्द आले आहेत.

लेखसंग्रह

आनुवंशिकेची जाणीव : कुटुंबांची गोत्रे

Category:

 

गोत्र हे देखील कुटुंब आणि व्यक्ती ओळखण्याचे साधन आहे. आणि त्याबद्दल विज्ञानीय दृष्टीकोनातून विचार करणे आवश्यक आहे. निरीक्षणे आणि अनुभवावरून मानवाने ज्ञान मिळविले आहे. कदाचित निरीक्षणे आणि अनुभवावरून त्याच्या लक्षात आले असावे की, पितृवंशाकडून जास्त प्रभावी गुणसुत्रे, अपत्यात प्रवाहित होत असावीत. म्हणूनच नर अपत्यांना, पित्याचे आडनाव आणि गोत्र दिले जाते.

लेखसंग्रह

भारतीय आडनावे

Category:

 

भारतात, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत वेगवेगळ्या भाषिकांचे, संस्कृतींचे, चालीरिती आणि परंपरा जपणारे प्रदेश आहेत. पंजाब, अुत्तर प्रदेश, बंगाल, राजस्थान, गुजराथ, महाराष्ट्र, कोंकण-कारवार, कर्नाटक, आंध्र, तामीळनाड, केरळ वगैरे प्रदेशात, कुळ ओळखण्याच्या वेगवेगळ्या पध्दती आहेत.

लेखसंग्रह

आडनावाची खरोखर गरज आहे का?

Category:

 

जगभरची कुलनामे म्हणजेच आडनावे रूढ होण्याच्या पध्दती आणि कारणे जवळजवळ सारखीच आहेत. निवास, व्यवसाय, जात, कर्तृत्व, पद, हुद्दा, स्वभाव, सवयी, गुणावगुण, व्यंग वगैरेंमुळे आडनाव पडते किंवा बर्‍याच वेळी ते समाजाकडून किंवा प्रतिष्ठित व्यक्तीकडून त्या कुटुंबावर लादले जाते.

लेखसंग्रह

आडनावाचीही पसंती हवी

Category:

 

काही मराठी आडनावे इतकी विचित्र आणि लाजिरवाणी असतात की, ती, त्या कुटुंबांनी का स्वीकारली, कोणत्या कारणामुळे रूढ झाली आणि पिढ्यानपिढ्या कशी वापरात ठेवली हे फार मोठे गूढ आहे. अशी आडनावे धारण करून समाजात वावरणार्‍या मुला-मुलींना विशेषतः विद्यार्थी/विद्यार्थीनींना आणि लेकी-सुनांना टीका, निंदा, हेटाळणी आणि टिंगल यांना सतत तोंड द्यावे लागते, मनस्ताप सहन करावा लागतो अशी अडचणीची आडनावे बदलण्याची आवश्यकता आहे. ती आडनावे बदलून घ्यावीशी वाटण्याची प्रेरणा समाजात रुजली पाहिजे. समाजासाठी आडनाव धारण करून, समाजात वावरावयाचे असल्याने, विक्षिप्त आडनावे हा सामाजिक कलंक आहे असे मी मानतो आणि तो पुसण्यासाठी, धुवून काढण्यासाठी पुरोगामी बदलत्या दृष्टीकोनातून उपाय योजायला हवेत, प्रयत्न करायला हवेत. कायदेशीररित्या नावात/आडनावांत बदल करून घेणे हा प्रमुख आणि प्रभावी उपाय आहे.

लेखसंग्रह

आडनावाची गरज : व्यक्तीची अचूक ओळख

Category:

 

समाजात, आडनावामुळे तो विशिष्ट कुटुंबगट ओळखला जातो. आडनावामुळे त्या कुटुंबातील व्यक्तीच्या आनुवंशिक स्वभाववैशिष्ठ्यांची आणि गुणावगुणांचीही ओळख पटते. विवाह जुळवितांना या माहितीचा फार अुपयोग होतो.

लेखसंग्रह

मराठी आडनावे कोश : सुरूवात आणि कार्यपध्दती

Category:

 

मराठी ज्यांची मातृभाषा आहे अशा कुटुंबांच्या आडनावांची, अक्षरानुक्रमे यादी, 3 मे 1963 पासून, म्हणजे माझ्या 30 व्या वाढदिवसापासून, एका डायरीत लिहीण्यास सुरूवात केली. हीच मराठी आडनावकोशाची सुरूवात. ऑगस्ट 1970 पर्यंत 6 हजार, नोव्हेंबर 1972 पर्यंत 8 हजार तर 1973 च्या जून महिन्यापर्यंत जवळजवळ 10 हजार आडनावे जमा झाली होती. सध्या हा आकडा 60 हजारापर्यंत पोचला आहे.

आरोग्य

तुवरक / कडू कवठ

Category:

 

तुवरकाचे उपयुक्तांग आहे बीज व बीज तेल.हे चवीला तुरट,कडू,तिखट असून उष्ण गुणाचे व हल्के स्निग्ध व तीक्ष्ण असते.तुवरक कफनाशक व वातनाशक आहे.