लेखसंग्रह

आपलं स्वयंपाकघर.. भाग पाच

Category:

 

चपात्या करताना ओट्यावर कागदाचा अवश्य वापर करावा. कारण चिकट कणिक, तेल, तूप, सांडून ओटा मेणचट होतो. मग तो धुतल्याशिवाय स्वच्छ होत नाही.

लेखसंग्रह

आपलं स्वयंपाकघर.. भाग चार

Category:

 

स्वयंपाककरण्यापूर्वी, करत असताना आणि करून झाल्यावर स्वयंपाकाचा ओटा, गॅसच्या शेगड्या स्वच्छ करण्यासाठी हाताजवळ एखादं ओटा पुसायचं फडकं ठेवावे. त्याने मधून मधून ओटा, शेगड्या पुसून घ्याव्या. त्यामुळे ओट्यावर सांडलेले पदार्थ लगेच साफ करता येतात. सांडलेले अन्न पदार्थ बराच वेळाने साफ करायचे म्हटले तर ते वाळल्यामुळे ओटा सतत धुवावा लागतो.

लेखसंग्रह

आपलं स्वयंपाकघर.. भाग तीन

Category:

 

अॅप्रन वापरणे हे अजुनही मागील पिढीतील स्त्रियांना एखादे फॅड वाटते. ‘उगाचच· कौतुक’ असा सूरही ऐकायला येतो.

OK – वय वर्षे १७५
लेखसंग्रह

OK – वय वर्षे १७५

Category:

 

हा शब्द तुम्ही स्वतः अनेक वेळा उच्चारला असाल आणि असंख्य वेळा इतरेजनांकडून ऐकलेला असाल . कुणी तो OK असा वापरतात तर कुणी Okay असा . या शब्दाला मुद्रित अवस्थेत अवतीर्ण होण्यास आज १७५ वर्षे उलटली आहेत अमेरिकेत प्रकाशित होणाऱ्या ‘ द बोस्टन मॉर्निंग पोस्ट ‘ या दैनिकात OK हा शब्द सर्वप्रथम प्रसिद्ध झाला .

लेखसंग्रह

आडनावांच्या गमती जमती

Category:

 

 एकदा मला दुपारच्या जेवणाचे आमंत्रण मिळाले, ते मी स्वीकारलेही. आणि नेमके ते घर कोठे ते विसरलो. भलत्याच गल्लीबोळात ते घर शोधू लागलो, तसे समोरून दोन शाळकरी मुलींनी लगेच मला विचारले, ‘काका, आपणास कुणाकडे जायचंय? ‘ मी लगेच माझी अडचण त्यांना सांगितली. ‘मला ‘देवा’ कडे जायचंय. ‘ त्या ‘आ’ करून माझ्याकडे पाहू लागल्या. माझे काय चुकले मलाच कळेना!

एका भटक्याने अनुभवलेला अफगाणिस्तान
लेखसंग्रह

एका भटक्याने अनुभवलेला अफगाणिस्तान

Category:

 

गेल्या सहा दशकांत अफगाणिस्तानमध्ये अनेक स्थित्यंतरे झाली. या काळामध्ये ज्या भटक्यांनी अफगाणिस्तानला भेट दिली त्यांनी आपल्याला भावले तसे या देशाबद्दल लिखाण करुन ठेवले आहे. त्यांच्यातलाच एक आहे निक डँझिगर. धाडसी प्रवृतीचा जातिवंत भटक्या पक्षी. १९८२ साली निकला `विन्स्टन चर्चिल फेलोशिप’ मिळाली. या आर्थिक बळावर पुढे निक डँझिगर याने प्राचीन `सिल्क रुट’चा प्रवास करुन त्यातील अनुभवांवर आधारलेले `डँझिगर्स ट्रॅव्हल्स’ हे पुस्तक लिहिले.

लेखसंग्रह

बडोदा वस्तूसंग्रहालय

Category:

 

वस्तुसंग्रहालय म्हणजे ऐतिहासिक ठेवा जतन व संवर्धन करण्याचे ठिकाण होय. ‘वस्तुसंग्रहालय’ या संकल्पनेचा उगम युरोपमध्ये झाला. इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात अलेक्झांड्रीयामधील टॉलेमी राजाने आपल्या राजवाड्यात पहिल्यांदा वस्तुसंग्रहालय सुरू केले. या राजवाड्यातच अलेक्झांडर द ग्रेट यांचा ग्रंथसंग्रह ठेवण्यात आला होता. परंतु ग्रीक लेखक पॉसॉनियस यांच्या माहितीनुसार इ.स. दुसऱ्या शतकात अथेन्स शहरात एका मोठ्या दालनात काही पेंटिंग्ज सार्वजनिक प्रदर्शनासाठी ठेवलेल्या होत्या. ही प्राचीन काळातील सार्वजनिक वस्तुसंग्रहालयाची सुरुवात होती.

लेखसंग्रह

दिल्ली नावामागचा इतिहास

Category:

 

दिल्ली ही भारताची राजधानी आहे. दिल्ली म्हणजेच भारताच हृदय. हिंदीमध्ये ‘ये दिलवालो की दिल्ली है’ असं म्हटलं जात. दिल्लीला ऐतिहासिक, भौगोलिक आणि आर्थिक वारसा लाभला आहे. ही दिल्ली परकीयांचे आक्रमण आपल्या अंगाखांद्यावर झेलत मोठ्या कणखरपणे उभी राहिली, याच दिल्लीने भारताचा स्वातंत्र्यलढा सर्वात जवळून पाहिला, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात याच दिल्लीच्या नावाने ‘चलो दिल्ली’ ही प्रसिद्ध घोषणा देण्यात आली, या दिल्लीने भारतीय तिरंगा ध्वजाला मुक्त आकाशात फडकतांनी पाहिलंय, या दिल्लीने भारतीय संविधानाचा निर्माण होतांनी पाहिलंय.

लेखसंग्रह

मुंबई ते ठाणे रेल्वे – १७१ वर्षे…

Category:

 

हिंदुस्थानी आगीची गाडी, तिला बांधला मार्ग लोखंडी मनाचाही वेग मोडी, मग कैची हत्ती घोडी… भारतात आगगाडीच्या आगमनाचे स्वागत करणारी एक कविताच गोविंद नारायण माडगावकर यांनी ‘मुंबईचे वर्णन’ या आपल्या पुस्तकात ‘कटाव’ या शीर्षकाखाली दिली आहे. ब्रिटिशांनी भारतातील आपले साम्राज्य अधिक मजबूत होण्यासाठी तसेच दळणवळण वेगाने होण्यासाठी आगगाडी म्हणजेच रेल्वेचे जाळे विणले.