लेखसंग्रह

लढा सीमेचा – लढा अस्मितेचा !! (भाग ३)

Category:

 

१ नोव्हेंबर १९५६ ….! तत्कालीन म्हैसूर (कर्नाटक) राज्याचा स्थापना दिवस ! कन्नडीगांच्या जीवनात आनंद घेऊन आला, परंतु मराठी माणसाचा कर्दनकाळ ठरला. परकीयांची सत्ता गेली नि स्वकीयांच्या गुलामगिरीत जगण्याची वेळ ‘मराठी’वर आली. म्हैसूर राज्यात स्थापना दिवसाचा जल्लोश सुरू झाला. ऐन दिवाळीतल्या या दिवसामुळे कन्नडीगांचा आनंद व्दिगुणीत झाला. परंतु माय महाराष्ट्रापासून दूरावलेल्या मराठी माणसाच्या मनात पोरकेपणाची भावना निर्माण झाली.

लेखसंग्रह

शिवजातस्य संभाजी महाराज : उत्तरार्ध

Category:

 

मागील भागामधून, छ. संभाजी महाराजांची जडण घडण कशी झाली ? त्यांच्या राज्याभिषेकाचे महत्व काय ? याबाबत माहिती पहिली. या भागामधून संभाजी राजांची छत्रपती, स्वराज्य रक्षक म्हणून कशी कारकीर्द होती या बाबत माहिती घेणार आहोत. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर छ. संभाजी महाराजांच्या व्यक्तित्वाचा धावता आढावा घेण्याचा एक प्रयत्न….

लेखसंग्रह

शिवजातस्य संभाजी महाराज : पूर्वार्ध

Category:

 

छ. शिवाजी महाराजांनी अहोरात्र झटून राज्य साधनेची लगबग करून, सह्याद्रीच्या कुशीत एक स्वाभिमानी स्वराज्य उभे केले. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर त्या स्वराज्याची जबाबदारी छ. संभाजी महाराजांनी तितक्याच ताकदीने उचलली आणि स्वराज्याचे रक्षण करताना अखेर स्वतः च्या प्राणांची आहुती दिली. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर छ. संभाजी महाराजांच्या व्यक्तित्वाचा धावता आढावा घेण्याचा एक प्रयत्न….

लेखसंग्रह

गोष्ट सांगा आणि गणित शिकवा – १०

Category:

 

ऍक्वेरिअम म्हणजे एक प्रचंड मोठे तळं होते. तळ्याच्या मध्यभागी एक गोलाकार ऐसपैस, रुंद मनोरा बांधला होता! किनाऱ्यावरून मनोऱ्यापर्यंत जायला चांगला 20 मिनिटाचा बोटीचा प्रवास करावा लागला. मनोऱ्याचा पहिला मजला पाण्याच्या वर आणि नंतरचे 9 मजले पाण्याखाली होते. त्याचा खाली काँक्रिटचे कॉलम. तसे तळं 300 फूट खोल होत, कॉलम बुडाशी असलेल्या एका टेकडी वर बांधला होता.

लेखसंग्रह

गोष्ट सांगा आणि गणित शिकवा – ९

Category:

 

सगळे परत त्रिकोणी नगरात आले होते. एरटोस्थिनिस काकांचेही कांम आटोक्यात आले होते. आज संध्याकाळी सगळे एकत्र जेवण करत होते… सायलीला इथली शेपूची भाजी खावी लागत होती आणि आता थोडी थोडी आवडू लागली होती… (कुणाला सांगू नका प्लिज)… नॉट बॅड, पटकन गिळून टाकली की झालं…

लेखसंग्रह

लढा सीमेचा- लढा अस्मितेचा !! (भाग २)

Category:

 

राजकीय स्वार्थापोटी मराठी माणसात फूट पाडून हे आंदोलन कायमचे बंद पाडण्याचा घाट कर्नाटक सरकारने चालविला आहे. राष्ट्रीय पक्षाचे नेते राष्ट्रीयत्वाचे धडे देऊन मराठी माणसाला आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपमतलबी नत्यांचे कुटील कारस्थान ओळखून मराठी माणसाने आता वेळीच सावध झाले पाहिजे. नाहीतर सगळेच गमावून बसावे लागेल … कायमचे! हुतात्म्यांनी बलिदान दिले ते माय मराठीच्या रक्षणासाठी… संस्कृतीच्या संवर्धनासाठी!

लेखसंग्रह

अहोवा

Category:

 

हा एक सुरक्षितता या विषयावरील लेख आहे ज्यात अपघात होता होता वाचणे या बद्दल चा विचार मांडला आहे. गुगलने स्त्री-दाक्षिण्य या शब्दाचे इंग्लीश मध्ये आणि Near miss accident याचे मराठी मध्ये पराकोटीचे हास्यास्पद भाषांतर केले आहे. इतके विक्षिप्त की त्याची अर्थ-कारणमीमांसा शोधणे मराठी (मराठीच काय कुणाच्याही) बुद्धीच्या पलीकडे आहे. अपघात होता-होता वाचला याला चपखल बसेल असा एकही शब्द न मिळाल्यामुळे आणि गुगल महाराजांनीही मार्गदर्शन न केल्यामुळे त्याचे संक्षिप्त स्वरूप म्हणून अहोवा या संक्षिप्त रूपाचाच (शॉर्ट-फॉर्म) या लेखात वापर करावयाचे ठरविले आहे.

लेखसंग्रह

लढा सीमेचा – लढा अस्मितेचा !! (भाग – १)

Category:

 

संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा सर्वप्रथम ठराव करण्यात आला तो 1946 च्या बेळगावात झालेल्या साहित्य संमेलनात! पुढे संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. समितीच्या आंदोलनातून महाराष्ट्राची निर्मिती झाली, परंतु ती संयुक्त महाराष्ट्राची नव्हती, तर अपूर्ण महाराष्ट्राची!

लेखसंग्रह

मंदीतील सुवर्णसंधी

Category:

 

सरकारची धोरणे,वाढते प्रदूषण कमी करण्याचे आव्हान आणि हळूहळू होणारी जनजागृती या मुळे ग्राहक इलेक्टिक वाहनाकडे वळायला नुकतीच सुरवात झाली आहे. हजारो कोटींची गुंतवणूक विद्युतवाहना मध्ये होत आहे. कोव्हिडं चा हा काळ आणि वाहनवर्गाचे संक्रमण लवकरच संपेल आणि पेट्रोल/डिझेल व विद्युत वाहनांना लवकरच चांगले दिवस येतील. ज्या उद्योजकांना वाहन क्षेत्रात व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी, विशेषतः ज्यांना ऑटो डीलर बनायचे आहे त्यांच्यासाठी येते एक वर्ष खूप महत्वाचे आहे. तुम्ही या वर्षात विद्युत दुचाकी वाहनांची डीलरशिप खूप कमी गुंतवणूकीत घेऊ शकता आणि 2025 नंतर येऊ घातलेल्या विद्युत वाहन क्रांतीचा घटक बनून, प्रचंड नफा व स्थैर्य मिळवू शकता.