लेखसंग्रह

सिनेमा बनताना – बॉम्बे टू गोवा

Category:

 

”दिल तेरा है, मै भी तेरी हु सनम “ या गाण्याच्या वेळी अमिताभ बच्चन याचे गुडघे सोलवटले होते, पण सांगणार कोणाला? नवखा होता ना, त्याही परिस्थितीत त्याने गुडघ्याला रुमाल बांधून शुटींग केले. “देखाना हाय रे सोचाना “ गाण्याच्या वेळी अमिताभ बच्चनला १०२ ताप होता. एक दिवस शुटींग थांबले. पण शुटींग जास्त थांबवून चालणार नव्हते म्हणून मेहमूदने त्याला सांगितले तुला जमतील तश्या स्टेप्स कर, व सहकलाकारांना  त्याला प्रत्येक सीन नंतर टाळ्या वाजवून प्रोत्साहन द्या असे सांगितले. तरीही त्याने असा काही डान्स केला कि शंकाही येत नाही कि त्याने तापामध्ये शुटींग केले असेल.

लेखसंग्रह

उत्कृष्ट अभिनेता -संजीव कुमार

Category:

 

संजीवकुमारने प्रत्येक रोल आव्हान म्हणून स्वीकारला. त्याची लांबी बघितली नाही कारण त्याला आपल्या अभिनयाच्या ताकदिवर पूर्ण विश्वास होता, त्याला दस्तक चित्रपट मिळाला.त्या चित्रपटाला अवॉर्ड मिळाले ( ह्या चित्रपटातील “ हम हे मताए कुचा बाजार की तरहा “ या गाण्यात संजीवकुमारची अगतिकता,चीड द्वेष पाहिली की संजीवकुमार काय चीज आहे हे लक्षात येते फक्त पाच ते दहा सेकंद त्याच्यावर शूट आहे ) कोशिश मध्ये तर एकही वाक्य नव्हते ,जे बोलायचे होते ते डोळे  व देहबोलीतून.नया दिन नई  रात ह्या चित्रपटासाठी आधी दिलीपकुमारला विचारले होते पण त्याने सांगितले की “ माझ्या पेक्षा  संजीवकुमार काम जास्त चांगले करेल.” उलझन चित्रपटांच्यावेळी सुलक्षणा पंडित त्याच्या प्रेमात पडली,पण त्याने नकार दिला.

लेखसंग्रह

बेन हर (१९६०)

Category:

 

एखाद्या सिनेमाचा आस्वाद करताना त्याचे थिम म्युझीक त्या सिनेमाशी किती एकरुप होउ शकते याचे सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे बेन हर. सिनेमाच्या प्रत्येक फ्रेमला जिवंत करणारे एक विलक्षण पार्श्वसंगीत बेन हर हा सिनेमा पाहताना तुम्ही अनुभवत राहता. इतके की सिनेमा संपल्यानंतरही बरेच तास ते तुमच्या डोक्यातून जात नाही. ते सारे प्रसंग तुम्हाला राहून राहून आठवत राहतात..अगदी तुमच्या स्वप्नातही..ही कमाल मिल्कस रोजाच्या जबरदस्त थीम संगीताची आहे.

लेखसंग्रह

हरहुन्नरी गीतकार संवाद लेखक-राजेंद्र कृष्ण

Category:

 

१९४८ गांधीहत्येनंतर त्यांनी “सुनो,सुनो,ऐ दुनियावालो बापूजीकी अमर कहानी” गाणे लिहिले जे रफिसाहीबानी गायले होते संगीत होते,हुस्नलाल भगतराम यांचे. ते प्रचंड गाजले. “बडी बहन” ची गाणी खूप गाजली.त्याबद्दल निर्मात्याने  त्यांना ओस्तिन कार  भेट दिली.त्यांनी हिंदीतल्या जवळजवळ सगळ्या संगीतकाराबरोबर काम केले.हुस्नलाल भगतराम पासून ते आर.डी.बर्मन पर्यंत.एका झटक्यात गाणी लिहिणे हा त्यांचा हातखंडा होता. त्यांची गाणी लिहिण्यावर इतकी हुकुमत होती कि ते लिहायला कागद नसेल तर पाच मिनिटात सिगारेटच्या पाकिटावर गाणे लिहित असत..