लेखसंग्रह

कॉम्पुटर लँग्वेज

Category:

 

केशव दहावी नापास असलेला तरूण. एका कॉम्पुटर इन्स्टीट्यूटमध्ये नोकरीस लागला होता. आपल्याला कॉम्पुटरमधील बरेच समजते असे दाखविण्याची त्याची नेहमीच धडपड असे. त्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता तो इन्स्टीट्यूटची चावी आणायला देशपांडे सरांच्या घरी सकाळी गेला,

लेखसंग्रह

हल्ल्यामध्ये सुध्दा विकीलीक्स आपल्याला इंटरनेटवर सुरु ठेवण्याच्या प्रयत्नात

Category:

 

सर्वत्र इंटरनेटवर जरी विकीलीक्सची अमेरिकन सरकार आणि हॅकर्स द्वारे कोंडी केली जात असली, तरी सुध्दा ऑनलाईन राहण्याचा प्रयत्न विकीलीक्स करीत आहे.

लेखसंग्रह

स्वप्ने पहा, जोखीम घ्या आणि यशस्वी व्हा !!!

Category:

 

“त्याच्या जीवनाचे ध्येय पैसे कमविणे हे नव्हते, तर तंत्रज्ञानाप्रती असलेली त्याची ओढ हे होते.” एखाद्याला आपली शक्ती आणि कार्यशक्तीची जाणीव असणे म्हणजेच विश्वास होय. विश्वासानेच जीवनात यशाला वश करावयास शिकले पाहिजे.

लेखसंग्रह

योगाभ्यास आणि प्राणायाम – भाग ३

Category:

 

“प्राण” या संस्कृत शब्दाचा अर्थ जीवन असा आहे, तर “यम” म्हणजे शिस्त, नियंत्रण, नियमावली आणि पारंगतता होय. “प्राण” याचा दुसरा अर्थ श्वास असा होतो. याचे करण श्वास नसेल, तर जीवन असणार नाही. श्वसन हे शरीरातील स्वायत्त कार्य होय आणि त्याच्यावरच आपणास नियंत्रण करावयाचे असते.

लेखसंग्रह

सहकारातही हवा माहिती अधिकार

Category:

 

माहिती-अधिकाराच्या कायद्यामुळे विविध क्षेत्रातील गैरव्यवहार, फसवणूक आदींवर अंकुश ठेवण्यात यश येत आहे. पण, या कायद्याच्या कक्षेत येत नसल्याने सहकार क्षेत्रातील वाढत्या गैरव्यवहारांना आवर घालणे कठीण ठरत आहे. या पार्श्वभूमीवर सहकार क्षेत्र माहिती अधिकाराच्या कक्षेत आणण्याबाबत विचार करावा ही मुंबई उच्च न्यायालयाने केलेली सूचना महत्त्वाची मानायला हवी.

लेखसंग्रह

साखरशाळांचे भवितव्य टांगणीला

Category:

 

विद्यार्थ्यांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्याचा कायदा नुकताच करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्यातील साखर कारखान्यांच्या परिसरात सुरू असणार्‍या साखरशाळा बंद करुन त्या जागी नियमित शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. हा निर्णय चांगला असला तरी अंमलबजावणीतील गोंधळामुळे ऊसतोडणी कामगारांच्या हजारो मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.

लेखसंग्रह

ओबामांची हातचलाखी

Category:

 

ओबामांच्या भारत दौर्‍याने दोन देशांमधील संबंध नव्या वळणावर आणून ठेवले असून आपल्या पुढील पिढ्या समृद्धीचे गाणे गातील असे वातावरण गेले काही दिवस पहायला मिळत आहे. प्रत्यक्षात मात्र ओबामांनी मोठ्या प्रमाणात हातचलाखी केली असून भारताच्या पदरात जे काही पडले ते तातडीने गरजेचे नव्हते असे म्हटले जात आहे. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर यांनी केलेले विश्लेषण.

लेखसंग्रह

दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव

Category:

 

दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. हा प्रकाशाचा उत्सव साजरा करताना आपण काळोख्या रात्रीला तेजोरत्नांच्या अलंकारांनी सजवतो, नटवितो, शोभायमान करतो. सर्व प्रकारचे अंधार मागे टाकून उज्ज्वल प्रकाशाच्या दिशेने आपले प्रत्येक पाऊल पुढे पडावे, अशी मनोमन इच्छा बाळगून आपण दिवाळीचे स्वागत करूया असे ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी महान्यूजशी बोलतांना सांगितले.

लेखसंग्रह

धर्म आणि आरोग्य

Category:

 

अश्विन महिन्यातील कृष्ण त्रयोदशी ज्या दिवशी प्रदोषकाल – व्यापिनी असेल त्या दिवसाला धर्मशास्त्राप्रमाणे धनत्रयोदशी म्हटले जाते.