नामवंत प्रसूतीतज्ज्ञ डॉ. अरविंद संगमनेरकर
Category:
व्यक्ती-परिचयमहाराष्ट्रातील नामवंत प्रसूतीतज्ज्ञ, शतायुषी या मराठीतील सर्वाधिक खपाच्या दिवाळी अंकाचे संपादक आणि उत्तम लेखक डॉ. अरविंद संगमनेरकर यांनी पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रसूतीतज्ज्ञ म्हणून काम केले. त्यांनी महाराष्ट्र आणि राज्याबाहेरील आरोग्य शिबिरांमध्ये सहभागी होऊन दोन लाखांहून अधिक महिलांची आरोग्य तपासणी केली.