साहित्य - ललित

आफ्रिकन स्त्रीचे आभूषण प्रेम !

Category:

 

नुकताच  दक्षिण  आफ्रिकेला  जाण्याचा  योग  आला  होता. निसर्गच वरदान लाभलेली  भूमी.  असे वर्णन तिचे करता येईल. ऊतम हवा, भरपूर पाणी, नद्या नाले आणि नेत्रदीपक धबधबे दिसत होते. त्याच प्रमाणे प्रचंड झाडेझुडपे, वेली, क्षितिजा पर्यंत  पसरलेली जंगले,  आणि त्या जंगलात साम्राज्य गाजवणारी अनेक जंगली जनावरे.

साहित्य - ललित

चुकलेला अंदाज!

Category:

 

जीवनाच्या दैनंदिनीत अनेक घटना घडतात. त्याकडे बघण्याचा द्रीष्टीकोन,  त्याला सामोरे जाताना भिन्न असतो. त्यामध्ये दडला असतो, लपला असतो, एक बंदिस्त त्रिकोण. ज्यात असतो स्वार्थ, प्रासंगिक भावना, आणि परिस्थिती बद्दलचे अज्ञान. ह्याची जाणीव तिव्रतेने होती. जेंव्हा आपले अन्दाज चुकतात. विशेषकरुन जे इतर अपरिचिताना अनपेक्षित हानिकारक ठरतात त्या वेळीच.

साहित्य - ललित

झाडावारले निर्माल्ये !

Category:

 

मला अद्याप कळले नाही कि आपण  निसर्गाने अर्थात त्याच ईश्वराने  निर्माण केलेले सौंदर्याचे प्रतिक सुंदर फुल का तोडतो. तोडून ते देवमुर्तीवर वाहून त्याच परमेश्वराला आपण आनंदी वा समाधानी करतो आहोत. ही भावनाच विचीत्राशी वाटते.

साहित्य - ललित

अनुभवात ईश्वरी दर्शन !

Category:

 

प्रत्येक व्यक्तीचे अध्यात्मिक ध्येय असते की तिने त्या चैतन्यमय ईश्वरी शक्तीचे अस्तित्त्व जाणावे, अनुभवावे. कुणाला ईश्वर भेटला  वा दिसला,  ह्याची खऱ्या अर्थाने विचारवंताना देखील सत्यता पटलेली नाही.  परंतु अनेक प्रसंगातून मात्र त्याच्या योजनेची शक्तीची कुशलतेची जाणीव निश्चित झालेली आहे. आणि तो केवळ अनुभव जरी मिळाला तरी त्यात संपूर्ण समाधान व सार्थक असेल. ही भावना हेच ईश्वरी अनुभूतीचे दर्शन ठरविणारे असेल.

साहित्य - ललित

आजी ग आजी!

Category:

 

सर्वाना आपली आजी खुप आवडत असते. जेथे फक्त प्रेम व माया भरपूर प्रमाणात तुमच्यावर सतत बरसत असते. त्यात कोणताच राग नसतो. शिस्त लावण्याची गरज भासण्याची वृत्ती नसते. कोणताही लोभ व्यक्त झालेला दिसत नाही. फक्त निर्मळ प्रेम. वासना विकार रहीत. कदाचित हे वयाचे व परिस्थितीचे गुणधर्म असू शकतील. आजी म्हणून ती जी भूमिका करते, ती एकदम त्यात एकरूप होऊन गेल्या प्रमाणे भासते.

साहित्य - ललित

अंगठ्याचा ठसा

Category:

 

आजच्या आधुनिक युगाने   आणि संगणकासारख्या इलेक्ट्रोनिक माध्यमांनी सुध्या  ओळख  माण्यतेसाठी अंगठ्याचा  ठसा हाच एकमेव प्रभावी साधन असल्याचे मान्य केले आहे. त्याच्या समोर अंक, शब्द, खुणा, प्रतिमा, इत्यादी दुयमच ठरतात. त्या अनामिक अशिक्षित परंतु अनुभव संपन्न मावशीला अभिवादन करून मी घरी आलो.

साहित्य - ललित

आनंद लुटणारे मन !

Category:

 

सहयोग मंदिर ठाणे, येते नुकताच जुन्या गाण्यांचा, संगीताचा बहारदार  कार्यक्रम झाला होता. सभागृह तुडुंब भरले होते. मी पण तो आस्वाद घेण्यासाठी गेलो होतो. सर्व श्रोत्यांना बसण्यासाठी भारतीय बैठक होती. माझ्यासमोर एक प्रौढ स्त्री बसलेली होती. तिच्या शेजारी दोघेजण होते. ती त्यांच्याशी अधून मधून संवाद करीत होती. सर्वजण त्या अतिशय मधुर संगीताचा आनंद लुटीत होते.