जिबूती
Category:
शहरे आणि गावेजिबूती हा पूर्व आफ्रिकेतील आफ्रिकेच्या शिंगामधील एक छोटा देश आहे. जिबूतीच्या उत्तरेला इरिट्रिया, पश्चिम व दक्षिणेला इथियोपिया व आग्नेय दिशेला सोमालिया देश आहेत.
Category:
शहरे आणि गावेजिबूती हा पूर्व आफ्रिकेतील आफ्रिकेच्या शिंगामधील एक छोटा देश आहे. जिबूतीच्या उत्तरेला इरिट्रिया, पश्चिम व दक्षिणेला इथियोपिया व आग्नेय दिशेला सोमालिया देश आहेत.
Category:
शहरे आणि गावेडॉमिनिका हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स भौगोलिक प्रदेशामधील एक लहान द्वीप देश आहे. हा देश कॅरिबियन समुद्रामध्ये ग्वादेलोपच्या दक्षिणेस व मार्टिनिकच्या उत्तरेस ७५० चौरस किमी क्षेत्रफळाच्या बेटावर वसला असून २००१ साली येथील लोकसंख्या केवळ ७१,२९३ इतकी होती. रुसाउ ही डॉमिनिकाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
Category:
शहरे आणि गावेकामेरून हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. इतर आफ्रिकन देशांच्या तुलनेत कामेरूनला राजकीय व सामाजिक स्थैर्य लाभले आहे.
Category:
शहरे आणि गावेगांबिया हा पश्चिम आफ्रिकेतील देश आहे. हा आफ्रिका खंडातील सर्वात छोटा देश आहे. गांबियाच्या पूर्व, उत्तर व दक्षिण दिशांना सेनेगल हा देश तर पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. गांबिया ह्याच नावाच्या पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या नदीच्या भोवताली हा देश वसला असून बंजुल ही गांबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
Category:
शहरे आणि गावेइसवी सनाच्या अकराव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत बहुतांश इंडोचायना द्वीपकल्पावर राज्य गाजवणाऱ्या सामर्थ्यवान हिंदू-बौद्ध ख्मेर साम्राज्याचे वारसदार राज्य म्हणजेच आजचा आधुनिक कंबोडिया म्हणता येईल.आधुनिक कंबोडियाची राजधानी फ्नोम पेन्ह येथे वसलेली आहे.
Category:
शहरे आणि गावेकॅनडा हा उत्तर अमेरिकेतील एक प्रमुख देश आहे. रशियानंतर कॅनडा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे.
Category:
शहरे आणि गावेकाबो व्हर्देचे प्रजासत्ताक (पोर्तुगीज: República de Cabo Verde; लोकप्रिय नाव: केप व्हर्दे) हा पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळ १० बेटांच्या द्वीपसमूहावर वसलेला एक देश आहे. हा द्वीपसमूह अटलांटिक महासागरामध्ये पश्चिम आफ्रिकेच्या ५७० किमी पश्चिमेस स्थित आहे. १५व्या शतकापर्यंत पूर्णपणे निर्मनुष्य असलेला हा द्वीपसमूह १४६० साली पोर्तुगीजांनी शोधुन काढला व तिथे वसाहत स्थापन केली. आफ्रिकेतील गुलामांना युरोपामध्ये नेणारी जहाजे येथे थांबा घेत असत. ह्यामुळे १७व्या व १८व्या शतकात केप व्हर्देची भरभराट झाली. १९व्या शतकात गुलागिरीवर बंदी घालण्यात आल्यानंतर केप व्हर्देची अर्थव्यवस्था खालावत गेली. १९७५ मध्ये पोर्तुगालने केप व्हर्देला स्वातंत्र्य मंजूर केले. सध्या केप व्हर्दे संयुक्त राष्ट्रे, आफ्रिकन संघ इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. २०१५ साली ५.२५ लाख लोकसंख्या असलेल्या केप व्हर्देचे बहुसंख्य रहिवासी मिश्र युरोपीय व आफ्रिकन वंशाचे आहे.
Category:
शहरे आणि गावेमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक हा आफ्रिकेच्या मध्य भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. ह्याच्या उत्तरेला चाड, ईशान्येला सुदान, पूर्वेला दक्षिण सुदान, दक्षिणेला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक व काँगोचे प्रजासत्ताक तर पश्चिमेला कामेरून हे देश आहेत. युबांगी ही काँगो नदीची एक प्रमुख उपनदी मआप्रच्या दक्षिण दिशेने वाहते. बांगुई ही मआप्रची राजधानी व सर्वात मोठे शहर ह्याच नदीवर वसलेले आहे.
Category:
शहरे आणि गावेफिजीचे प्रजासत्ताक (इंग्लिश: Republic of Fiji; फिजीयन: Matanitu ko Viti; फिजी हिंदी: फ़िजी गणराज्य) हा दक्षिण प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागातील एक द्वीप-देश आहे. हा देश सुमारे ३३२ बेटे असलेल्या द्वीपसमूहाचा बनला असून ह्यांपैकी ११० बेटांवर लोकवस्ती आहे. व्हिटी लेवू व व्हानुआ लेवू ही येथील प्रमुख बेटे आहेत. फिजीची राजधानी सुवा व्हिटी लेवू बेटावरच वसली आहे व ७५ टक्के रहिवासी सुवा महानगर परिसरामध्ये वास्तव्यास आहेत.
Category:
शहरे आणि गावेचिलीचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República de Chile RepChile.ogg उच्चार (सहाय्य·माहिती)) हा दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक अत्यंत चिंचोळा देश आहे. चिलीच्या पश्चिमेला व दक्षिणेला प्रशांत महासागर, उत्तरेला पेरू, ईशान्येला बोलिव्हिया तर पूर्वेला आर्जेन्टिना हे देश आहेत. चिलीला ६,४३५ किमी लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे[३]. प्रशांत महासागरातील ईस्टर द्वीप चिलीच्या अधिपत्याखाली येते तर अंटार्क्टिका खंडाच्या १२,५०,००० वर्ग किमी भागावर चिलीने आपला हक्क सांगितला आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti