उद्योगाचे 4 थे आवर्तन – नवीन लाडका शब्द की एक संधी
Category:
लेखसंग्रहउद्योग क्षेत्रात ५० वर्षे वावरल्यानंतर, वारंवार वापरले जाणाऱ्या नवनवीन लाडक्या शब्दांबद्दल मी जरा सावधच असतो. काही वेळा तर असे नवीन शब्द वा घोषणा म्हणजे ‘बाटली नवीन पण दारू तीच’ अशी परिस्थिती असते. अशा शब्दांचा संध्याकाळच्या सोशल पार्टीमध्ये वापरण्यापलीकडे फारसा उपयोग नसतो. असे शब्द फारसे टिकत पण नाहीत. मात्र काही नवीन शब्द त्यांच्यामधील बळकट संकल्पनेमुळे काळाच्या प्रवाहात टिकून रहातात. उदा. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट [TQM], रिव्हर्स इंजिनियरिंग इ.