आंदोलन नव्हे, प्रतियोगिता परीक्षांची तैयारी करा
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनजन्मापासून दिल्लीत रहात असलो तरी महाराष्ट्रात जावेच लागतेच. एकदा नागपूरला गेलो असताना सहज नाक्यावर उभ्या काही तरुणांशी चर्चा केली. बहुतेक मराठी तरुण सरकारी परीक्षांची तैयारी करतच नाही. काही तरुण कालेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर, सरकारी नौकरीचा विचार करतात. फार्म भरल्यानंतर ३-४ महिन्यांच्या अर्धवट तैयारीवर, परीक्षा पास करण्याचे स्वप्न बघतात, जे संभव नाही. मग सुमार बुद्धीचे इतर भाषिक परीक्षा पास होतात आणि हुशार मराठी तरुण, पूर्ण व नियमित तैयारी नसल्यामुळे, असफल होतात.