लेखसंग्रह

बुद्धिबळ

Category:

 

बुद्धीबळ (chess) खेळणारा व्यक्ति आपल्या बुद्धीचा वापर करून, त्या खेळाचे नियम समजून त्या खेळामध्ये पारंगत होतो. त्याचप्रमाणे आपण ही ज्ञानाच्या आधाराने जीवनाचे नियम समजून, बुद्धीचा वापर करून प्रत्येक कार्य करावे. तेव्हाच आयुष्यामध्ये संतुष्टतेचे धन कमवू शकतो. स्थूल धनासोबत संतुष्टतेचे धन ही आपण बुद्धीबळाद्वारे प्राप्त करू शकतो. सुखी-समाधानी होऊ शकतो.

लेखसंग्रह

इमानदारी…

Category:

 

इमानदारीत काम करणाऱ्या कामगाराला त्याच्या मालकाने त्याच्या कामाचा इमानदारीतच मोबदला द्यायला हवा ! पण तसे न होता या इमानदार लोकांचीच आज समजात दुर्दैवाने जास्त पिळवणूक होताना दिसते. मग नकळत मनात विचार येतो…इमानदारीचा ठेका काय फक्त गरिबांनीच घेतलेला आहे का ?…

लेखसंग्रह

जसे कराल तसे भराल

Category:

 

‘जसे कराल तसे भराल ’ हा कर्माचा अटळ सिद्धांत आहे परंतु प्रत्यक्ष व्यवहारात आपला अनुभव असा की जो माणूस न्याय-नीती-धर्माने वागत असतो, त्याला जीवनात खूप दुःखे भोगावी लागतात. उलट अधर्म अनीतीने वागणारे, काळाबाजार आणि तस्करी करणारे, जीवनात मौज-मजा करत असतात. गाडी, बंगला इत्यादी सर्व तऱ्हेच्या सुखसोयी यांची त्यांच्या जीवनात रेलचेल असते.

लेखसंग्रह

चिकाटी

Category:

 

आजचे आपले जगणे इतके गतिशील झाले आहे की प्रत्येक गोष्ट लवकर हवी. झटपट मॅगी, फास्ट नेटवर्क, रातोरात श्रीमंती.. .. अश्या अनेक गोष्टी आपण बघतो त्यामुळे काही मिळवण्यासाठी परिश्रम, चिकाटी, जिद्द हवी हे आता विसरत चालले आहेत. शालेय जीवनामध्ये value education दिले जाते पण practical जीवनात मात्र काही दिसून येत नाही. इमानदारी, चिकाटी, जिद्द, प्रामाणिक हे सर्व फक्त कथा कादंबऱ्या मध्येच वाचायला मिळतं.

लेखसंग्रह

मनात रुतलेला एक काटा !

Category:

 

दुःखात क्षण थांबण्याचा भास होतो परंतु तसे नसून तो एक मनाचा खेळ असतो जो आपल्याला त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याला विरोध करतो. आनंदाचे क्षण चटकन निघून जातात हाही एक भ्रमच कारण माणसाच्या मनाला एक काटा नेहमीच रुतलेला असतो, तो म्हणजे “असमाधानाचा ” तो काटा निघताही नाही आणि नेहमी हळूहळू टोचत राहतो.

लेखसंग्रह

मिसिंग टाइल थेरपी

Category:

 

मनाचा आढावा घेणारे आपले मानसशास्त्रज्ञ नेहमीच आपल्याला स्वतः चा शोध घ्यायला शिकवतात. कदाचित आपण कधी तितके स्वतः चे परीक्षण आजवर केले ही नसू पण त्यांनी अनेक प्रयोगा द्वारे त्याची जाणीव करून दिली आहे. मानसशास्त्रामध्ये एक प्रसिद्ध सिद्धांत आहे, मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी!

लेखसंग्रह

कृतज्ञता – एक कौटुंबिक संस्कार

Category:

 

कृतज्ञता  हे  मानवी स्वभावाचे एक अंग आहे.किंबहुना ते असायलाच  हवे. त्यावरून तो किती सुसंस्कृत आहे हे दिसून येते. तो एक महत्वाचा संस्कार आहे. काहीजणाकडे तो उपजत असतो. काही जणांकडे तो डोळसपणे आपल्या आजूबाजूला, समाजाकडे पहिल्याने येतो. त्यासाठी माणसाने सामाजिक भान ठेवायला हवे. पण कृतज्ञता संस्काराचे मूळ स्त्रोत आहे स्वत:चे कुटुंब. कुटुंबातील मोठ्या माणसांकडे तो असणे गरजेचे आहे.

लेखसंग्रह

प्रेरणा

Category:

 

“प्रेरणा”मग ती कशी कां असेना, अंतिम परिणाम ‘आत्मविश्वास’ हाच असायला हवा. म्हणतात नं, “स्वत:वर विश्वास असेल तर अंधारात देखील वाट सापडते.”

लेखसंग्रह

वृत्ती, प्रवृत्ती, आकृती, विकृती

Category:

 

आज अनेकजण कोरोनामुळे संघर्ष करत आहेत तर काहींनी आपली जवळची माणसे गमावली आहेत. खरेच आपण ज्यांनी माणसे गमावली आहेत त्यांना ‘ बी पॉझिटिव्ह ‘ हा सल्ला देऊ शकतो का?

लेखसंग्रह

वर्तमानकाळ म्हणजे काय?

Category:

 

जसा भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे तसा वर्तमानकाळ नाही. काळ क्षणाने मोजला जात असेल तर तो दुसर्‍या क्षणी उरत नाही, त्या क्षणाला परत आणता येत नाही. पुढचे क्षण ह्या क्षणी दिसत नाहीत. मग ‘चालू क्षण’ म्हणजेच वर्तमानकाळ का? तसे असेल तर ‘वर्तमानकाळ’ क्षणभंगूर आहे.