भरकटलेली आणि बेजबाबदार!
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनप्रकाशन दिनांक :- 21/03/2004
जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा सगळ्यात मोठा पंचवार्षिक ‘शो’ लवकरच होऊ घातला आहे. 14 व्या लोकसभा निवडणुकीला देश सामोरा जात आहे. जीवनाचा प्रवास करताना काही ठिकाणं, काही वळणं अशी येतच असतात की, जिथे क्षणकाल थांबून आजवर केलेल्या प्रवासाचे मूल्यमापन करायचे असते.