कर्जमुक्ती नव्हे मते मिळविण्याची युक्ती
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसरकारची बहुप्रतीक्षित कर्जमाफी अखेर घोषित झाली आणि अपेक्षेप्रमाणे ती प्रचंड गोंधळाच्या स्वरूपात राहिली. साठ हजार कोटींच्या या कर्जमाफीमुळे चार कोटी शेतकरी लाभान्वित होतील असा सरकारचा दावा आहे, प्रत्यक्षात साठ लाख शेतकरी तरी कर्जमुत्त* आणि चितामुत्त* होतील की नाही याचीच शंका आहे. आत्महत्याठास्त भागातील शेतकऱ्यांना एकवार कर्जमुत्त* करावे ही मागणी सुरुवातीला 2001 सालापासून आम्हीच लावून धरली.