दिनविशेष

गोवा मुक्ती दिन

Category:

 

१९ डिसेंबर १९६१ रोजी गोव्यात तिरंगा फडकला आणि गोवा मुक्त झाला. दीव आणि दमन आधीच मुक्त झाले होते. या तिघांना मिळून केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. नंतर १९६७ साली सार्वमताने गोवा घटक राज्य म्हणून घोषित झाले. गोवा, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशात १९६३ साली निवडणूक झाली.

दिनविशेष

बिनाका गीतमाला

Category:

 

६६ वर्षापूर्वी ३ डिसेंबर १९५२ रोजी ‘बिनाका गीतमाला’ची सुरुवात रेडीओ सिलोन वरून झाली आणि चित्रपट संगीताची थक्क करून सोडणारी अफाट लोकप्रियता जगासमोर आली. हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात बिनाका गीतमाला ‘माइलस्टोन’च्या रूपाने उभी आहे आणि अमीन सयानी त्याचे अविभाज्य घटक आहेत.

दिनविशेष

मेरा नाम जोकर

Category:

 

मेरा नाम जोकर’ हा राज कपूर यांचा एक ‘क्लासिक’ चित्रपट. ‘ये दुनिया एक सर्कस है’, असं म्हणत राज कपूर यांनी भारतीय प्रेक्षकांना ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटात सर्कस दाखवली. हा भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिला चित्रपट होता कि ज्याला दोन मध्यांतर होते. हा चित्रपट एकूण ४ तास ३० मिनिटांचा होता.

दिनविशेष

जागतिक टेलिव्हिजन दिवस

Category:

 

१९९६ च्या मार्च महिन्यातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात २१ नोव्हेंबरला जागतिक दूरदर्शन दिनाची साजरा करण्याची घोषणा झाली होती. या दिवशी विश्व दूरदर्शन सभा भरविण्यात आली होती. १९९६ साली दूरदर्शनचा ‘इडियट बॉक्स’ खेडोपाड्यात पोहोचला नव्हता व म्हणून प्रस्तुत दिनाची ‘‘श्रीमंतांचा दिवस’’ अशी हेटाळणी देखील झाली होती.

दिनविशेष

फेसबुकचा वाढदिवस

Category:

 

इंटरनेटच्या प्रसारामुळे ‘हे विश्वची माझे घर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आली असली तरी या जगाला एका कुटुंबाप्रमाणे बनवण्याचे श्रेय जाते ते फेसबुकला. या सोशल नेटवर्किंग साइटचा वापर करणा-यांची संख्या १८० कोटींहून अधिक असल्याने फेसुबक म्हणजे १८० कोटींहून अधिक लोकांचे एक कुटुंबच बनले आहे.

दिनविशेष

सदाबहार चित्रपट ‘पडोसन’ची पन्नास वर्षे

Category:

 

काही विनोदी सिनेमे असतात असे जे आज ही आपणास मनमुराद आंनद देतात आपल्या कुटुंबियां सोबत ‘पड़ोसन ‘हा सिनेमा बघण्याची आज ही मज्जा काही आगळीच असते. अगदी हसवत ठेवणारा सिनेमा..