दिनविशेष

फेसबुक’ चा वाढदिवस

Category:

 

१ ऑक्टोबर २०१० रोजी डेव्हिड फिन्चर दिग्दर्शित ‘द सोशल नेटवर्क’ चित्रपट प्रदर्शित झाला. तो मार्क झुकेरबर्ग व फेसबुकवर आधारित आहे. २२ फेब्रुवारी २०११ रोजी इजिप्तमध्ये एका मुलाचे नाव फेसबुक ठेवण्यात आले, कारण इजिप्तच्या क्रांतीत फेसबुकचा महत्त्वाचा वाटा होता.

दिनविशेष

बनारस हिन्दू विश्व विद्यालय स्थापना दिवस

Category:

 

विद्यापीठाची एकूण ३७ वसतिगृहे असून त्यांपैकी सहा वसतिगृहांत मुलीच राहतात. विद्यापीठीय आवारात २८ वसतिगृहे आहेत. विद्यपीठाचे एक सुसज्ज आंतरराष्ट्रीय वसतिगृह असून तेथे पन्नास विदेशी विद्यार्थी राहण्याची सोय आहे.

दिनविशेष

पाकिजा संगीतमय क्लासिक चित्रपटाची 50 वर्ष

Category:

 

मीना कुमारीच्या अभिनयाने सजलेल्या ‘पाकिजा’कडे एक चित्रपट म्हणून नव्हे तर एक अमर कलाकृती म्हणून बघितले जाते. पण हीच अमर कलाकृती साकारण्यासाठी तब्बल १४ वर्षे लागलीत. होय, १९५८ साली या चित्रपटाचे शूटींग सुरु झाले आणि १९७२ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला.

दिनविशेष

मार्क झुकेरबर्ग’ चे यशाचे १० मंत्र

Category:

 

अनेक लोकांना वाटते की, फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गला एका रात्रीत यश मिळाले. मात्र, त्या लोकांचा हा गैरसमज आहे. कारण मार्क झुकेरबर्गने फेसबुक उभी करण्यासाठी खूप कष्ट उपसलेले आहेत. त्याचे फंडे वापरून तुम्हीही यश मिळवू शकता.

दिनविशेष

जागतिक पाणथळभूमी दिवस

Category:

 

सागरी किनारपट्टीवर असलेल्या अशा गवतयुक्त पाणथळ प्रदेशांमुळे लाटांनी होणारी किनाऱ्यांची धूप थांबवली जाऊन वादळांपासून होणारे नुकसानही घटते. अतिवृष्टी झाल्यास अधिकचे पाणी किनारी पाणथळ प्रदेशांत मुरते आणि मानवी वस्ती जलमय होण्याच्या संभाव्य धोक्याचे प्रमाण कमी होते.

दिनविशेष

ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी’ ची पहिली आवृत्ती

Category:

 

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या शब्दकोश विभागाचा ‘शब्द’ ब्रिटिश इंग्रजीकरिता अंतिम मानला जातो. याला कारणही तसेच आहे. ‘फिलॉलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन’ या भाषाशास्त्राच्या संस्थेतील सभासदांनी १८५७ मध्ये तत्पूर्वीचे शब्दकोश अपूर्ण आणि सदोष असल्याने शब्दांचे पुनःपरीक्षण करून नवा शब्दकोश तयार करण्याचे ठरवले. प्रत्यक्ष कृती फार मंदगतीने होत गेली. अखेर १८७९ मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसशी करार होऊन न्यू इंग्लिश डिक्शनरीच्या कामास सुरुवात झाली.

दिनविशेष

पुण्यातील ‘राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाचा’ वर्धापनदिन

Category:

 

‘चित्रपट संग्रहालय’ ही संकल्पना आपल्या देशात सिनेमाचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला तरी अस्तित्वात आली नव्हती. १९५१ च्या पाटील कमिटीच्या शिफारसीनंतर, चित्रपटाच्या आगमनाच्या ६०-६५ वर्षांनंतर- म्हणजे फेब्रुवारी १९६४ मध्ये भारतात राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाचे कार्य पुण्यात सुरू झाले. प्रथम फिल्म इन्स्टिटय़ूटच्या आवारात ‘फिल्म लायब्ररी’ म्हणून तिचे अस्तित्व होते.

दिनविशेष

एक नयनरम्य, देखणा सोहळा.. ‘बीटिंग द रिट्रीट’

Category:

 

युद्ध सुरू असताना सूर्यास्त झाल्यावर रणांगणावरील सैनिक आपापल्या छावण्यांमध्ये परत जात. यावेळी एक सांगीतिक समारंभ आयोजित केला जाई. त्याला बीटिंग द रिट्रीट म्हणत. हाच सोहळा प्रजासत्ताक दिनाच्या समारोपप्रसंगी रायसीना हिल्सवर होतो.

दिनविशेष

’ती फुलराणी’ नाटकाचा पहिला प्रयोग

Category:

 

ती फुलराणी हे पु.ल.देशपांडे यांनी जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकाचे केलेले मराठी रूपांतरण आहे. पु.लंच्याच शब्दांत “ती फुलराणी” म्हणजे “स्वर आणि व्यंजन यांच्या ब्रम्हघोटाळ्यात सापडलेल्या माणसांची कथा !”