जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचा वर्धापनदिन
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानकॅप्टन ग्लॅडस्टन सॉलोमन यांची जे. जे. मधील प्राचार्य-संचालक पदाची कारकीर्द (१९१९-३६) विशेष संस्मरणीय ठरली. त्यांच्या काळात जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या व त्यामुळे या कलाशाळेचे नाव भारतभर गाजू लागले. १९२० च्या दरम्यान चौथ्या वर्षाच्या विदयार्थ्यांसाठी सॉलोमन यांनी प्रत्यक्ष नग्न व्यक्तिप्रतिमानावरून (न्यूड मॉडेल) अभ्यास करण्यासाठी ‘न्यूड लाइफ-क्लास’ सुरू केला. त्यामुळे विदयार्थ्यांस शरीरशास्त्राचा प्रत्यक्ष मानवी शरीरावरून अभ्यास करण्याची संधी मिळाली. नग्न व्यक्तिप्रतिमान व त्याच्या अभ्यासामुळे प्राप्त झालेल्या अभ्यासाला दिशा व उत्तेजन देण्यासाठी सॉलोमन यांनी भित्तिचित्र-सजावटीचा (म्यूरल डेकोरेशन) वर्ग सुरू केला (१९२०).