इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी रद्द केली
दिनविशेष

इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी रद्द केली

Category:

 

१२ जून १९७५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. जगमोहनलाल सिन्हा यांनी निवडणुकीतील गैरव्यवहारप्रकरणी राजनारायण यांनी दाखल केलेल्या खटल्यात इंदिरा गांधी यांना दोषी ठरवून त्यांची खासदारकी रद्द केली.

दिनविशेष

पारसी समाजाचे नववर्ष नवरोज

Category:

 

ग्रेगरी कॅलेंडरनुसार, पतेती किंवा नवरोज वसंत ऋतूमध्ये साजरा केला जातो. पारशी समाज मूळचा इराण या देशातील. या देशाचे पूर्वीचे नाव म्हणजे पर्शिया, पारशी लोकांचे वास्तव्य असलेला देश. पण चौदाव्या शतकात इराणमध्ये धर्म परिवर्तनाचे वारे सुरु झाले आणि पारशी लोकांवर अत्याचार करण्यात येऊ लागला. त्यामुळे पारशी समुदायाने तो देश सोडला. यापैकी मोठा समुदाय हा भारतात आला आणि मुंबईत वास्तव्य करु लागला.

दिनविशेष

जागतिक जंगल दिन

Category:

 

ॲ‍मेझॉनचे जंगल तर वनस्पती आणि प्राण्यांच्या तीस लाख प्रजातींचे आश्रयस्थान आहे. हे जंगल जगातील सर्वात मोठे सदाहरित जंगल आहे. ॲ‍मेझॉनचं जंगल हा नेहमीच जगाच्या आकर्षणाचा विषय राहिला आहे. बाहेरील लोकांसाठी ॲ‍मेझॉनचं गुढ आणि रहस्यानं भरलेलं जंगल नेहमीच खुणावत असतं.

दिनविशेष

सुनील गावसकर यांनी पहिले शतक झळकावले

Category:

 

वेस्ट इंडिजमधील पदार्पणाच्या कसोटी मालिकेत त्यांनी ७७४ धावा काढून मालिका जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्यानंतर त्यांची बॅट निवृत्तीपर्यंत तळपत राहिली. १९८३ मध्ये त्यांनी डोनाल्ड ब्रॅडमन यांचा सर्वाधिक कसोटी शतकांचा (२९ शतके) हा विक्रम मोडला.

दिनविशेष

जागतिक बालरंगभूमी दिवस

Category:

 

बालरंगभूमी हा उत्तम अभिनेता किंवा अभिनेत्री घडविण्याचा पाया आहे. हा पाया लहान वयातच पक्का करून घेतला तर पुढे व्यावसायिक रंगभूमी, चित्रपट किंवा दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांसाठी कसदार अभिनय करणारे चांगले कलाकार मिळू शकतात. नाटक, चित्रपट किंवा दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमध्ये आघाडीवर असलेल्या अनेक कलाकारांची सुरुवात बालरंगभूमीपासूनच झाली आहे.

दिनविशेष

मौखिक आरोग्य दिवस

Category:

 

जेष्ठांपासून युवा वर्गापर्यंत मौखिक आरोग्य स्वच्छतेची काळजी आणि त्याच्या फायद्यांसंबंधी जागरूकता वाढवणे हाच या आंतरराष्ट्रीय दिवसाचा उद्देश आहे.

दिनविशेष

जागतिक चिमणी दिन

Category:

 

जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या बागेत, परसात जर त्यांच्या खाद्याची व्यवस्था केली तर आपल्याला चिमण्या दिसू लागतील. याचा अर्थ असा नाही की, आज आपण ‘बर्ड फिड’ ठेवले आणि उद्या लगेच १०-१२ चिमण्या दिसतील लागल्या. चिमणीलाही ती सवय होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. मात्र, यासाठी गरज आहे ती आपल्या इच्छाशक्तीची.

दिनविशेष

महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह

Category:

 

सामाजिक समतेच्या दृष्टिकोनातून मुंबई विधान परिषदेतील सदस्य रावबहादूर सीताराम केशव बोले यांनी ४ ऑगस्ट १९२३ रोजी मांडलेला एक ठराव संमत झाला होता. या बोले ठरावात असे म्हटले गेले होते की, ‘सार्वजनिक तळी, धर्मशाळा, मंदिरे, विद्यालये, न्यायालये आदी जी सरकारी खर्च वा अनुदानाने बांधली वा चालविली जातात, त्यात अस्पृश्यांना मुक्तखद्वार असावे.’

दिनविशेष

जागतिक आनंद दिवस

Category:

 

आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशांपेक्षाही खाली आहे. १४९ देशांच्या यादीत भारताला १३९ क्रमांक मिळालाय. यानुसार पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ या देशांमधील नागरिक भारतीय नागरिकांपेक्षा जास्त आनंदी आहेत.