आरोग्य

आहाररहस्य १६

Category:

 

जेवताना लक्ष जेवणाकडेच असावे. मन जर जेवणात नसेल तर अन्न पचत नाही.रसांचा आस्वाद नीट घेता येत नाही. आपण खात असताना लक्ष टीव्ही बघण्यात असेल तर लोणचे खातोय की मीठात बोट जातंय, हेच लक्षात येत नाही. सरळ सरळ एक चव बदलून दुसरी चव तोंडात जातेय. परिणाम बदलणारच.

आरोग्य

आहाररहस्य १५

Category:

 

जेवण सुरू झालं की, मौन पाळावे. अजिबात बोलू नये. काही हवे असल्यास आधीच वाढून घ्यावे. परतवाढीचे घ्यायचे नाही, म्हणजे आतूनही खुणा करून बोलायचे नाही. मनानेपण मौन पाळायचे.

आरोग्य

आहाररहस्य १४

Category:

 

आपण भारतीय उजव्या हाताने जेवतो. आणि एकाच हाताने जेवायचे असते. अन्नाला दोन्ही हात लावून जेवू नये. पाश्चात्य लोक दोन्ही हातात काटे, चमचे सुर्‍या घेऊनच फडशा पाडतात. त्यांची तशीच संस्कृती आहे. पण आपण भारतीय लोक फक्त उजवा हातच अन्नाला लावतो कारण डावा हात  दोन नंबरसाठी वापरत असल्याने जेवण्यासाठी निषिद्ध समजला आहे.