शहरे आणि गावे

मुंबई जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले हे शहर आहे. मुंबईचे एकूण क्षेत्रफळ ६०३.४ चौरस किलोमीटर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्‍यावर वसलेले आहे.

शहरे आणि गावे

मुंबई जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

मुंबादेवी याच देवीच्या नावावरुन या शहराला मुंबई असे नाव पडले. या देवीचे मंदिर मुंबईमधील क्रॉफर्ड मार्केट येथे महात्मा फुले मंडईत आहे.

श्री बाबुलनाथ मंदिर मलबार हिल येथील १७८० मध्ये बांधण्यात आलेले श्री बाबुलनाथ मंदिर तेथील शंकराच्या पिंडीसाठी प्रसिद्ध आहे.

शहरे आणि गावे

मुंबई जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

भारतातील पहिली रेल्वे मुंबई-ठाणे दरम्यान सुरू झाली. दि.१६ एप्रिल, १८५३ रोजी ती वाहतूकीस खुली करण्यात आली व त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. १८७० मध्ये मुंबईला कोलकाता या महानगराशी, तर १८७१ मध्ये चेन्नईशी लोहमार्गाद्वारे जोडण्यात आले.

शहरे आणि गावे

मुंबई जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

मुंबईच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे भारताच्या औद्योगिक, आर्थिक राजधानीचा मान मुंबईस मिळाला आहे. जगातील ‘फॉर्च्यून ४००’ कंपन्यांपैकी चार भारतीय कंपन्यांची कार्यालये मुंबईमधे आहेत. मुंबईतील औद्योगिक क्षेत्रात औषधनिर्माण, बांधकाम, अभियांत्रिकी, धातूउद्योग, रेशीमउद्योग, काचसामान, सिनेमा, प्लॅस्टिक, भारत व हिंदुस्थान पेट्रोलियम असे उद्योग आहेत.

शहरे आणि गावे

मुंबई जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

आजची मुंबई हा सात बेटांचा समूह होता. या बेटांवर पाषाणयुगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वांत जुना लिखित पुरावा इ.स.पू. २५० सालातील असून यात मुंबई शहराचा उल्लेख ग्रीकांनी (Heptanesia असा) नोंदवला आहे. इ.स.पू. ३ च्या सुमारास ही बेटे सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्यात समाविष्ट होती. शिलाहार या हिंदू साम्राज्याने १३४३ पर्यंत मुंबईवर राज्य केले व नंतर गुजरातच्या मुस्लिम साम्राज्याने मुंबई हस्तगत केली. एलिफंटा गुहा व वाळकेश्वर मंदिर ही याच काळातील आहेत.

शहरे आणि गावे

परभणी जिल्हा

Category:

 

परभणी परिसराशी अनेक पौराणिक संदर्भ जुळलेले आहेत. संत जनाबाईंच्या विठ्ठलभक्तीचा स्पर्श या जिल्ह्याला झालेला आहे. जिंतूरसारखे जैन भाविकांचे श्रद्धास्थान असलेले ठिकाण या जिल्ह्यात आहे.शिवाय दक्षिण गंगेचा (गोदावरीचा) काठ लाभलेल्या या जिल्ह्यातून मराठवाडा कृषी विद्यापीठ कार्यरत आहे.

शहरे आणि गावे

नागपूर जिल्हा

Category:

 

नागपूर जिल्हा हा भारताच्या जवळजवळ मध्यभागी स्थित असून भारताचा शून्य (0) मैलाचा दगड नागपूर शहरात आहे. नागपूर देशाच्या मध्यवर्ती स्थानावर असल्याने रस्ते, विमान व रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने हे भारतातील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. देशातील दुसर्‍या क्रमांकाचे हिरवे शहर असा नागपूरचा लौकिक आहे.

शहरे आणि गावे

नागपूर जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

या जिल्ह्यातील प्रमुख पिके संत्री व कापूस ही नगदी पिके आहेत. खरीप हंगामात मुख्यतः तांदूळ, ज्वारी, भूईमुग, कापूस, मूग, तूर, सोयाबीन ,तर रब्बी हंगामात ज्वारी व ऊस, डाळी, ही पिके घेतली जातात. महाराष्ट्रात गव्हाच्या क्षेत्रात नागपूर जिल्हा पहिल्या ५ जिल्ह्यांमधे आहे.

शहरे आणि गावे

नागपूर जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

डॉ.हेडगेवार यांनी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ मध्ये केली. यांचे बालपण नागपुरातच गेले व यांचे शालेय शिक्षणही येथेच झाले. त्यांना रा. स्व. संघाचे आद्य सरसंघचालक म्हटले जाते.त्यांनी अविवाहित राहून राष्ट्रकार्य करण्याचा संकल्प केला होता. तो त्यांनी रा. स्व. संघाच्या कार्याच्या माध्यमातून पूर्ण केला. त्यांच्या कार्याचे मुख्य केंद्र नागपूरच होते.

शहरे आणि गावे

नागपूर जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

नागपुरातील सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे वर्‍हाडी. मराठीची वर्‍हाडी बोलीभाषा विदर्भातील इतर भागांप्रमाणे येथेदेखील बोलली जाते. हिंदी भाषा व इंग्रजी या शहरातील इतर भाषा आहेत. २००१ च्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्या २,१२९,५०० इतकी होती.