wonton-soup-300
खाद्ययात्रा

वॉन्टॉन सूप

Category:

 

प्रथम वॉन्टॉनच्या पारीचे सर्व साहित्य एकत्र करा. त्यात थोडे पाणी घालून गोळा मळून तयार करा व झाकून ठेवा. मधल्या सारणासाठी चिकन खिमा, पातीचा कांदा थोडयाशा तेलावर परतून घ्या. त्यात मीठ व अर्धा टी स्पून आले-लसूण पेस्ट घाला व वाफेवर शिजवून घ्या.

Piyush
खाद्ययात्रा

उपवासाचे रताळ्याचे पियुष

Category:

 

थोडेसे मीठ घालून रताळी कुकरमध्ये छान उकडून घ्यावीत. उकडलेली रताळी गार करुन, साल सोलून, हाताने कुस्करुन घ्यावीत. मिक्सरला कुस्करलेली रताळी, गोड ताक, साखर, वेलची पावडर, केशर, मीठ एकत्र करुन मिल्क शेक सारखे घट्ट पियुष करावे.

Batata-vada-300
खाद्ययात्रा

बटाटा वडा

Category:

 

बटाटे उकडून सोलून घ्या व कुस्करून ठेवा. आले, हिरवी मिरची, कोथिंबीर यांचे बारीक तुकडे करा.एक चमचा तेल गरम करा. हिंग, आले व मोहरी टाका. तडतडल्यावर कढीपत्ता, हिरवी मिरची, हळद टाका. आता बटाटे मिसळून चांगले हलवा. थोडी साखर, लिंबू रस व मीठ टाका. चुली वरून उतरून घ्या. थंड झाल्यावर छोटे-छोटे लाडू सारखे गोळे करा. बेसन, धणे पावडर, एक चमचा गरम तेल व मीठ टाकून लापशी बनवा. जाडसर लापशी तयार झाल्यावर तळण्यासाठी तेल गरम करा. बटाट्याचे गोळे बेसनात बुडवून तेलात तळा.

ghavan-ghatale
खाद्ययात्रा

घावन घाटले

Category:

 

तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवावे. नंतर दळून आणावे.आपल्या अंदाजाने पीठ घ्यावे. त्यात थोडे मीठ व पाणी घालून धिरड्यासाठी पीठ भिजवतो तसे भिजवावे. सपाट तव्याला तेलाचाहात फिरवून त्यावर वरील पिठाची धिरडी घालावी.

shepu
खाद्ययात्रा

शेपूची भाजी

Category:

 

शेपू निवडून घ्यावा. खोल भांड्यात पाणी घ्यावे व स्वच्छ करावा. नंतर चिरून घ्यावा. कुकरच्या डब्यात शेपू व मिरच्या मोडून घालाव्यात. कुकरमध्ये २-३ शिट्ट्या करून भाजी शिजवावी. भाजीच्या डब्यावर झाकण ठेवून त्यावर भिजवलेले शेंगदाणे ठेवून तेही शिजवून घ्यावे. कढईत तेल गरम करावे. त्यात लसूण घालावी. लालसर होईस्तोवर परतावे. मेथीदाणे घालून गुलाबी रंग येईस्तोवर परतावे. नंतर मोहोरी आणि हळद घालून फोडणी करावी.

khatkhata
खाद्ययात्रा

खतखते

Category:

 

कणसाचे २ १/२” ते ३” लांबीचे तुकडे करून ठेवा. तुरीची डाळ, शेंगदाणे, कणसाचे तुकडे आणि चवीनुसार १-२ हिरवी मिरच्या प्रेशर कुकरमध्ये एकत्र शिजवून घ्या.

cucumber-kakadi
खाद्ययात्रा

काकडीचे कढण

Category:

 

काकड्यांची साले काढून घ्या व त्या किसणीवर किसून घेऊन त्या किसात दही, चवीनुसार मीठ व साखर घालून कालवून १० मिनिटे एका बाजूला ठेवा. काकडीच्या किसाला चांगले पाणी सुटेल. मग तो कीस हाताने पिळून त्यातील पाणी एका बाउलमध्ये काढा.

olya-kajuchi-bhaji
खाद्ययात्रा

ओल्या काजूची भाजी

Category:

 

काजूगर रात्री कोमट पाण्यात भिजत घालून सकाळी सोलावेत. बटाट्याची साले काढून तुकडे करावेत. प्रथम कढईत तेल टाकून जीरे-मोहरी, कांदा, लसुण व टोमॅटो टाकून चांगले परतवून घेणे. चांगले शिजल्यावर त्यात सोललेले काजू व बटाट्याचे तुकडे टाकून त्यात आवडीनुसार तिखट, हळद, मीठ व पाणी घालून शिजु द्यावेत.