भारतीय रसायनशास्त्रज्ञ प्रा. द. बा. लिमये
Category:
लेखसंग्रहप्रा. दत्तात्रेय बाळकृष्ण लिमये (१८८७-१९७१) यांनी १९११ साली पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात अभ्यास करून मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने एमए केले. त्यामुळे मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात त्यांना प्राचार्य शार्प यांनी प्राध्यापक पद देऊ केले होते. पण इंग्रज सरकारची नोकरी न स्वीकारण्याच्या त्या काळात त्यांनी ती नोकरी न स्वीकारता पुण्याला नव्याने निघालेल्या रानडे इंडस्ट्रियल अॅण्ड इकनॉमिक इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी पत्करली.