लेखसंग्रह

सोशल प्रोजेक्ट

Category:

 

बारा वर्षांचा राजन मराठी पाचवीच्या वर्गात होता. मधल्या सुट्टीत तो इतर मुलांसोबत डबा खाण्याऐवजी शाळेच्या मैदानात जाऊन विशाल वडाच्या सावलीत अर्धा तास बसत असे. घंटा होण्यापूर्वी पोटभर पाणी पिऊन पुन्हा वर्गात येऊन सगळ्यांमध्ये मिसळून जात असे.

लेखसंग्रह

सूक्ष्मातील ब्रह्मांड

Category:

 

१ जानेवारी २०१० ला ‘कुतूहल’ या सदराची जबाबदारी ‘समन्वयक’ म्हणून माझ्याकडे आली. माझ्या अगोदरच्या समन्वयकांनी या सदराला उच्च स्वरूप आणले होते त्यामुळे माझी जबाबदारी वाढली होती. वयाच्या ७८ व्या वर्षी वर्षभर सोमवार ते शनिवार सदर सातत्याने चालविण्याची जबाबदारी स्वीकारताना तेही माझ्या वैद्यकीय व्यवसाय व इंडस्ट्रियल अॅटॅचमेण्टस् सांभाळून- जरा विचार करावा लागला; पण प्रकृतीने उत्तम साथ दिली.

लेखसंग्रह

मूत्रविपरक्तता (ॲन्युरिया)

Category:

 

मूत्रपिंडातील क्रियाशील वृक्काणू (नेफ्रॉन) यांच्या क्रियेत बाधा आल्यास मूत्र तयार होणे बंद होते. याला मूत्रविपरक्तता किंवा अॅन्युरिया असे म्हणतात. २४ तासात ३०० मि.लि.पर्यंत मूत्र तयार झाल्यास त्याला लघवी कमी होणे (ऑलिम्युरिया) असे समजतात. परंतु त्यापेक्षाही मूत्र कमी तयार झाल्यास लघवी बंद झाल्याची लक्षणे दिसतात.

लेखसंग्रह

घोट्याचा सांधा

Category:

 

घोट्याचा सांधा हा आपल्या पायाजवळ जमिनीपासून २-३ इंच उंचीवर शरीराचे संपूर्ण वजन घेऊन हालचाल करणारा अतिशय महत्त्वाचा सांधा आहे.
हा सांधा एकूण तीन हाडांमध्ये तयार होतो

लेखसंग्रह

पाय मुरगळणे

Category:

 

पाय मुरगळणे (Ankle sprain) या गोष्टीचा अनुभव प्रत्येकालाच असतो. ‘पाय मुरगळून मी पडलो’ ही अगदी नेहमी आढळणारी रुग्णाची तक्रार असते.

लेखसंग्रह

वारंवार निखळणारा खांदा

Category:

 

खांदा हा असा सांधा आहे, की त्यात जास्तीत जास्त प्रकारच्या आणि सर्वात जास्त लांबपर्यंत फिरणाऱ्या हालचाली होतात. जो सांधा अशा रीतीने गोलाकार, पुढे-मागे फिरतो, आत वळतो, मागे वळतो असा दुसरा कोणताच सांधा आपल्या |शरीरात नाही. या सर्वविध हालचाल करणारा हा सांधा निसर्गतःच थोडा अस्थिर बनलेला आहे.

लेखसंग्रह

लहान मुलांच्या दातांची निगा कशी राखावी?

Category:

 

लहान मुलांच्या दातांची निगा राखणं खूप महत्त्वाचं आणि आवश्यक आहे. लहान मुलांच्या दातांना दुधाचे दात किंवा प्राथमिक दात असे म्हणतात. अती गोड व स्निग्ध पदार्थ उदा. चॉकलेट, बिस्किटं फास्ट फूड, आईस्क्रीम हे खाण्याचं प्रमाण मुलांमध्ये जास्ती असेल तर किडण्याचे प्रमाण अधिक आढळते. अशा पदार्थांमध्ये कार्बोहायर्डेट जास्ती असते. ते दाताला चिकटले आणि किडण्याचे प्रमाण वाढते. साधारणपणे सातव्या महिन्यापासून बाळाला दात येण्यास सुरुवात होते.

लेखसंग्रह

मनगटाचा सांधा

Category:

 

हा सांधा खूपच गुंतागुंतीचा आहे. कारण माणसाला आपल्या हाताची निरनिराळी निपुण हालचाल करण्यासाठी या सांध्याचा उपयोग होतो. मनगटाजवळ ३६०० वर्तुळाकार हालचाली झाल्याने हात उलथा आणि पालथा होऊ शकतो. तसेच हातात काहीही पकडण्यासाठी ४५० वरच्या बाजूला व एखादी गोष्ट टेबलवरून उचलण्यासाठी २५-३०० हात खाकी- या सांध्यातून आपल्याला हलविता येतो अशा रितीने हाताच्या सर्व निपुण हालचाली होण्यासाठी मनगटाचा सांधा १०० टक्के फिट असावा लागतो.

लेखसंग्रह

मानवी शरीरात कोणती संमिश्रे वापरतात?

Category:

 

धातूंचे आणि त्यांच्या संमिश्रांचे जे अगणित उपयोग आहेत त्यातील काही माणसाच्या शरीरातदेखील केले जातात. दातांमध्ये भरण्यासाठी वापरली जाणारी चांदी किंवा मोडलेल्या हाडांना जोडण्यासाठी आणि आधार | देण्यासाठी धातूंच्या पट्ट्यांचा उपयोग केला जातो.

लेखसंग्रह

अस्थिसच्छिद्रता (ऑस्टिओपोरोसिस)

Category:

 

हा एक चयापचयाचा रोग आहे. यात हाडाची घनता कमी होते व बाह्यकाची जाडी कमी होते. हाडाची झीज आणि भर ही सतत चालणारी प्रक्रिया असते. तिशीपर्यंत हाडाचा बाह्यक (कॉर्टेक्स) कठीण होत जातो. नंतर हाडाची झीज व भर समतोल झाल्यास हाडाचा कठीणपणा तसाच राहतो; पण त्यात, तफावत पडून झीज जास्त झाली तर हाडात सच्छिद्रता येऊन कठीणपणा कमी होतो. पाठीच्या कण्यात, खुब्यात, हाताच्या रेडियस हाडात जाळीदार भागाची झीज होते, पुरुषांच्यात याचे प्रमाण २० ते ३०%, तर स्त्रियांत ४० ते ५०% असते.