नरकचतुर्दशी – अर्थात पहिली आंघोळ..
Category:
लेखसंग्रहआज ‘नरकचतुर्दशी’.. आपल्यासारख्या चाकरमान्यांच्या दृष्टीने हा दिवाळीचा पहिला दिवस असला तरी वसुबारसेपासून सुरू झालेल्या दिवाळसणाचा आजचा तिसरा दिवस..बहूजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महाजनांच्या ‘अभ्यंगस्नाना’चा हा दिवस.. नरकासूर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे नाव पडले असा पुराणांमधे उल्लेख आहे.