लेखसंग्रह

ती बाई

Category:

 

येता जाता रस्त्यावरच्या कुठल्याही कुत्र्या-मांजराच्या डोक्यावर हात फिरवून, त्याला एखादं बिस्कीट भरवणारा मी, एका जीवंत माणसाशी बोलायला का बिचकतो, हे माझं मलाच कळत नाही. कदाचित महसत्ता होऊ घातलेल्या देशाचा, पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याच्या विवंचनेत असलेला प्रतिष्ठीत नागरीक असणं, हे मला तसं करू देत नसावं, कुणास ठावूक?

लेखसंग्रह

श्रद्धा, अंधश्रद्धा आणि ज्योतिषशास्त्र

Category:

 

ज्योतिष ही श्रद्धा की अंधश्रद्धा या विषचाचं चर्वण करून करून चोथा झालाय अगदी. तरी पुन्हा पुन्हा नव्याने हा विषय चर्चिला जातोच. जो विषय चर्चेत असतो, त्या विषयाची लोकांना एकतर आवड असते किंवा नपड तरी असते. दोन्ही संदर्भात चर्चा ही होतेच. परंतू मी थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातून या विषयांवर बोलणार आहे.

लेखसंग्रह

गुरू….

Category:

 

गुरु’चा महिमा जेवढा आपल्या संस्कृतीत सांगीतला गेलाय, तेवढा क्वचितच इतरत्र सांगीतला गेला असावा. “गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वर..गुरुः साक्षात्परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नमः:” हे वचन आपल्या नित्याच्या व नैमितिक म्हणण्यात असतं.

लेखसंग्रह

ग्रामिण स्त्रीच्या भावविश्वातील विठ्ठल

Category:

 

ग्रामिण, कृषी संस्कृतीतील स्त्री-गीतांत आढळणारा ‘विठू’, ज्यांचं नांव-गांव कोणालाही ठाऊक नाही अशा स्त्रीयांच्या भावविश्र्वातलं विठ्ठलरूप ग्रामिण बोलींत हजारो अविट ‘वव्या’तून व्यक्त झालं आहे.

लेखसंग्रह

पांडुरंग-विठ्ठल

Category:

 

या दोन शब्दांचं अवघ्या महाराष्ट्रावर जी जादू आहे त्याला जगात कुठेच तोड नाही..रावा पासून रंका पर्यंत आणि मुख्यमंत्र्यापासून ते अगदी सामान्य माणसापर्यंत या दोन शब्दांचं आणि त्यावरच्या भक्तीचं गारुड आहे..

लेखसंग्रह

कबुतरखान्यांच्या निमित्ताने…

Category:

 

मुंबई आणि आसपासच्या परिसरात आढळणाऱ्या कबुतरांची गणना बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी करणार आहे. पहिल्या टप्प्यात कबुतरांची संख्या मोजली जाईल. दुसऱ्या टप्प्यात कबुतरखाने, कबुतरांचे राहणीमान, त्याचे लोकांवरील परिणाम आणि तिसऱ्या टप्प्यात विविध डॉक्टरांशी चर्चा करून, कबुतरांचे आरोग्य आणि कबुतरांचे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम या विषयी माहिती मिळविली जाईल. मुंबईत कबुतरांसाठी दाण्यांची, राहण्याची आणि सुरक्षेची सोय सहज होते. अशा अनेक कारणांमुळे मुंबईत कबुतरांची संख्या येत्या काळात अधिक वाढणार आहे, असे बीएनएचएसचे म्हणणे आहे.

लेखसंग्रह

एल निनो आणि त्याचे परिणाम !

Category:

 

दरवर्षी जून महिन्याच्या सुरवातीला देशात पावसाच्या आगमनाला सुरुवात होत असते. वेधशाळेच्या अंदाजानुसार त्याआधी सगळ्या प्रिंट मिडिया आणि वृत्तवाहिन्यांतून पावसाच्या आगमनाचे अंदाज वर्तवण्यात येत असतात. पण असे लक्षात येऊ लागले की अंदाज कुठेतरी चुकत आहेत! या सगळ्याला कुठलेतरी वातावरणातील बदल जबाबदार आहेत किंवा दैनंदिन जीवनात आपल्या हातून घडण्याऱ्या चुकीच्या कृतींचे पडसाद असतील. उदा. झाडे तोडणे त्या जागी नवीन झाडे न लागणे, त्यांचे संवर्धन न करणे, कारखान्यांतून आणि इतर गोष्टींतून वातावरणात प्रदुषित आणि विषारी वायूचे उत्सर्जन प्रमाणाच्या बाहेर होणे इत्यादी. काही प्रमाणत एल निनोचाही यात सहभाग असतो.

लेखसंग्रह

प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून होणं आवश्यक आहे.

Category:

 

काल-परवाच एक व्हीडीओ पाहिला. एका लहान मुलीला तिची आई हवीय. तिला भुकही लागलीय. पण ती ज्या शाळा नामक पिंजऱ्यात आहे, त्या पिंजऱ्याची टिचर नामक रिंगमास्टर तिला इंग्रजीतून प्रश्न विचारतेय. ती लहान मुलगी अगदी असहाय होऊन रडतेय, तर ती रिंगमास्टर तिला दम देऊन हसायला सांगतेय. काळीज पिळवटून जाणं काय असतं, ते हा व्हीडीओ पाहून कळतं आणि मनाचा संताप संताप होतो.