लेखसंग्रह

वंदे मातरम, मुसलमान आणि आपण सारे देशभक्त नागरिक..!!

Category:

 

वंदे मातरम’ने सध्या देशात वादळ उठलं आहे. एकेकाळी स्वातंत्र्याचा मुलमंत्र असलेला हा शब्द आज वादाचं कारण झालाय. ‘वंदे मातरम’चा जयघोष करतच आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे सर्व जाती-धर्माचे (मुसलमानहा) क्रांतिकारक, स्वातंत्र्य योद्धे हसत हसत सुळावर चढले,

लेखसंग्रह

कोकणची मुंबई का नको? काही कारणं

Category:

 

माझा आक्षेप आहे तो मुंबईचं माॅडेल डोळ्यासमोर ठेवण्याला. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असली, तिची अंतर्गत परिस्थिती पार मोडकळीला आलेली आहे. बाहेरून स्वर्ग दिसणारी मुंबई फक्त २०-२५ टक्के धनिकांची आहे आणि ते ही बाहरून मुंबईत आलेल्यांची. मुंबईत वाहतुकीचे, पर्यावरणाचे, निवासाचे प्रश्न अत्यंत गंभीर आहेत. मुंबईतील बहुसंख्य स्थानिक कधीच महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर गेलेले आहेत. मुंबईतले उद्योग कधीच उठले आहेत आणि त्याजागी सेवा उद्योग आलेले आहेत आणि तेथे बहुसंख्य बाहेरून आलेले लोक काम करत आहेत ही वस्तुस्थिती आहे. मुंबईतल्या गिरण्या, मोठमोठ्या गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत आणि तेथील स्थानिक माणूस मुंबईतच उपरा झालेला असून तिथेच कुठेतरी वाॅचमनची नोकरी करत आहे. ज्या उद्योगांमुळे मुंबई जगभरात प्रख्यात झाली, ते उद्योग प्रदुषणाचं कारण देत मुंबईबाहेर गेलेले आहेत. साधारण २०-२५ वर्षांपू्वी सोन्याचा धुर निघणारा, मुंबईचं इंडस्ट्रीयल हार्ट असणारा सीएसटी रोड आणि ठाणे-बेलापूर रोड आज मोठमोठाले हाऊसिंग काॅम्प्लेक्सेस आणि आयटी-बिपीओ कंपन्यांनी भरून गेलाय. मुंबईची औद्योगिक नगरी बनवणारे सर्व उद्योग मुंबबाहेर जाण्याच सर्वात महत्वाचं कारण म्हणजे, हे उद्योग अभे असलेल्या जमिनिंना आलेला सोन्या-रुप्याचा भाव आणि दुसरं म्हणजे ते करत असलेलं प्रदुषण.

लेखसंग्रह

कोकणची मुंबई; नको रे बाप्पा !

Category:

 

मुंबई, पुणे किंवा अन्य कोणत्याही मोठ्या शहरातला ऑक्सिजन संपत चाललाय. कोकणात मात्र तो मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. भविष्यातील पर्यटन काही बघण्यासाठी कमी आणि निर्मळ प्राणवायू मिळावा म्हणून जास्त होणार आहे याची जाणीव राज्यकर्त्यांनी नसली तरी स्थानिक जनतेने मात्र ठेवायला हवी. स्थानिक लोक्प्रतीनिधिनीही जनतेच्या या भावनांची कदर करून आपले पक्षभेद विसरून कोकणच कोकणत्व टिकवून ठेवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यांना तसं करण्यासाठी जनतेनेही (आणि विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही) त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे. ही काळाची गरज आहे.

लेखसंग्रह

मुंबई शहरातील वाहतूक कोंडी

Category:

 

आज प्रमुख शहरांमधील रोज वाढणारी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या आणि पर्यायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था लक्षात घेता ती तोकडी पडते की काय असे चित्र बघावयास मिळते किंवा शहरातील नागरिकांस सर्व दृष्टीने सोयीची नाही असे स्पष्ट होते. तरी बरं मुंबईतील बहुसंख्य नागरिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करून घेतात, नाही तर…! आजच्या घडीला शहरात वाहनांची एवढी कोंडी होते की एखाद्या ठराविक स्थानापर्यंत पोहचण्यास विलंब होतो.

लेखसंग्रह

सत्कार, शाल आणि श्रीफळ

Category:

 

कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा सत्कार शाल आणि श्रीफळ देऊन करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात तरी नक्की आहे. कदाचित देशात इतरत्रही असावी असं टिव्हीवरील इतर प्रांतात विविध व्यक्तींच्या केल्या जाणाऱ्या सत्कारांच्या क्लिप्स पाहून जाणवतं.

लेखसंग्रह

पावने-रावळे

Category:

 

आपल्याकडे अतिथीला देव माणून पुजण्याची पद्धत होतीच, ग्रामिण भागात अजुनही शिल्लक असेल. पावने म्हणजे रावळे, हेच ‘अतिथि देवो भव’

लेखसंग्रह

कौल आणि इस्लाम

Category:

 

श्रद्धेची चिकित्सा करू नये. मलाही करायची नाही. मला या लेखात ‘कौल’च्या योग्यायोग्यतेबद्दल बोलायचं नाही. मला तसा अधिकारही नाही, कारण मी कधी कौल लावला नाही व कुणी लावताना तिथं हजरही नव्हतो. मला तुम्हाला सांगायचंय ते ‘कौल’ या शब्दाबद्दल, या शब्दाच्या जन्माबद्दल…!

लेखसंग्रह

राऊळ – एक आडनांव

Category:

 

आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा ज्ञातीतलं एक आडनांव. कुडाळ नजिकच्या पिंगुळीच्या ‘राऊळ महाराजां’मुळे सर्वदूर परिचित आडनांव. गुजरातेत आढणारं ‘रावळ’ किॅवा ‘रावल’ आडनांव म्हणजे राऊळचंच गुजराती व्हर्जन..

लेखसंग्रह

मनाचा दगड आणि दगडातील जीवन

Category:

 

…भिती मनाचा दगड झाल्याची नाही, तर हा दगड समाजाचाच कपाळमोक्ष करील याची आहे. ती प्रक्रीया सुरू होण्यापूर्वीच हा दगड फोडला पाहीजे. दगडाच्या आतही जीवन असू शकतं हे रामदासस्वामींनी शिवरायांना दाखवून दिलं होतं. आता मात्र आपल्यालाच आपले रामदास स्वामी बनवून, स्वत:च्याच मनाचा दगड फोडून आतील जीवनाला वर आणायची कधी नव्हती येवढी गरज आज आहे.