लेखसंग्रह

सिद्धी जगण्याची

Category:

 

खरं तर मला भिक किंवा भिकारी हे शब्द, कोणत्याही, कोणच्याही आणि कशाच्याही संदर्भात उच्चारायला किंवा लिहायलाही आवडत नाही. त्या ऐवजी मी ‘दान’ किंवा ‘दान मागणारा’ असा शब्दप्रयोग करायचा प्रयत्न करतो, परंतू ‘दान’ देवळाच्या आत आणि बाहेर, ते व्हाया ‘सुटे गिराण’ निवडणूकप्रसंगी देशाच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत, असे सर्वच वेळप्रसंगी मागत असतात. पुन्हा या दानाला, ती भिकच असली तरी, प्रसंगानुरून वेगवेगळी भारदस्त नांवंही असतात. त्यामुळे मला जे पुढे सांगायचंय, त्याचं नीट आकलन तुम्हाला होणार नाही, म्हणून या लेखापुरता मी ‘भिक’ आणि ‘भिक मागणे’ असे दोन्ही शब्दप्रयोग करणार आहे.

लेखसंग्रह

कुटुंब आणि आजची स्त्री

Category:

 

कुटुंब आणि आजची स्त्री या विषयावर लेख लिहिताना प्रथंम एक गोष्ट मला आवर्जून नोंदवावीशी वाटते, ती म्हणजे या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या काढता येत नाहीत एवढ्या त्या एकरुप झालेल्या आहे.

लेखसंग्रह

धुळीचे साम्राज्य आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Category:

 

मुंबईत पावसाळ्यानंतर हवामानात अचानक कोरडेपणा आपल्यामुळे सगळीकडे धूळ मिश्रीत हवामान आहे. सातत्याने होत असलेल्या हवामानातील बदलांमुळे वाढत असलेला उष्मा, धूळ आणि धुराळामिश्रीत बदलती हवा मुंबईकरांच्या समस्या रोज वाढवतच आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळा चेंबूर, देवनार, सायन या भागात राहणाऱ्या अनेकांनी आरोग्याच्या तक्रारींमुळे राहती घर भाड्याने देऊन उपनगरांमध्ये शिफ्ट झाले आहेत. कचऱ्याच्या डम्पिंगमुळे होणारे श्वसनविकार आणि त्वचाविकारांमध्ये सातत्याने भर पडते आहे. गरोदर महिला, लहान मुले व वयोवृद्धांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे.

साहित्य - ललित

बाळासाहेबांच्या त्या भेटीचा तो क्षण

Category:

 

सन २०१०च्या जानेवारीत बाळासाहेबांसोबत भेटीचा योग आला होता..हा फोटो त्या भेटीच्या वेळचा आहे. अर्थात मी बाळासाहेबांच्या भेट मागितली आणि ती मिळाली, अस काही घडायला मी काही मोठा नव्हतो. मी तर त्यांचा साधा शिवसैनिकही नव्हतो. परंतु काही गोष्टी घडण्यासाठी आपलं नशीब लागतं आणि ते नशिब फळण्यासाठी योगही यावा लागतो. तसंच काहीसं या भेटीबाबत घडल.

लेखसंग्रह

पद्मावती – भाग दोन आणि जास्त महत्वाचा

Category:

 

आज सकाळी मी पोस्ट केलेल्या ‘पद्मावती’ या लेखातील श्री. संजय लीला भन्सालींच्या वडीलांचा मी केलेला उल्लेख बहुसंख्यांना खटकला, हे चांगलं की वाईट हे नंतर ठरवू, पण माझ्या लेखातून माझ्याकडून ती चुक का ‘झाली’ हे सांगणं माझं कर्तव्य ठरतं.

लेखसंग्रह

पद्मावती

Category:

 

मला वाटतं, आपल्याला भन्सालींसारख्या नतद्रष्टांना धडा शिकवण्यासाठी, आपण त्यांच्या चित्रपटावर वा कलाकृतींवर अशी बंदीची मागणी न करता, असे चित्रपट आपण कोणी पाहायचेच नाहीत असं ठरवावं. लोकशाहीत कोणत्याही विषयावर चित्रपट काढायला किंवा भाष्य करायला बंदी नाही. याला अविष्कार स्वातंत्र्य असं म्हणतात. त्याच लोकशाहीत तो चित्रपट पाहायलाच हवा असंही बंधन नाही. मग आपल्या हातात हे घटनात्मक हत्यार असताना, आपण बंदीची मागणी का करतोय हे अनाकलनीय आहे.

लेखसंग्रह

एव्हरी क्लाऊड हॅज सिल्व्हर लायनिंग

Category:

 

… “मी, माझी बायको-मुले, झालंच तर भाऊ-बहिणी, भाचे-पुतणे, साडू-मेव्हणे खातील तुपाशी, समोरचे साले मरूदे उपाशी” ह बहुतेक सर्वांचंच ब्रिदवाक्य झालेल्या आताच्या काळात, श्री.अनिरुद्ध जोशींची, स्वत:च्या कष्टाच्या पैशांची तमा न बाळगता दुसऱ्याच्या हक्काचा पैसा मिळवून देण्यासाठीची ही निस्वार्थ धडपड, हल्लीच्या काळात अत्यंत दुर्मिळ आणि म्हणून जपण्यासारखी आहे. किळसवाण्या स्वार्थाचे नवनविन विक्रम रचले जात असताना, श्री. जोशींसारख्या व्यक्तीही याच समाजात आहेत, ही समाजासाठी खुप मोठी आशेची बाब आहे. मी आणि माझं’ या पलिकडे जग नसलेल्या, स्वार्थाच्या काळ्याकुट्ट ढगात हरवलेल्या आजच्या समाजात, श्री. जोशींसारखी व्यक्ती मला, त्या ढगाला असलेल्या सिल्व्हर लायनिॅगप्रमाणे वाटते. आणि मग ‘एव्हरी क्लाऊड हॅज सिल्व्हर लायनिंग’ या म्हणीची सत्यता पटते आणि जगायला नव्याने हुरूप येतो..

लेखसंग्रह

जे होतं, ते चांगल्यासाठीच’..

Category:

 

‘जे होतं, ते चांगल्यासाठीच’ असं आपल्यात म्हणतात. कादचित जर काही वाईट किंवा मनाविरूद्ध घडलं, तर वाईट वाटू नये किंवा मनाला फार लागू नये म्हणून असे वाक्प्रचार आपल्या सांस्कृतीक पूर्वजांनी रुजवले असावेत, असं मला पूर्वी वाटायचं. पण आपल्या पूर्वजांनी जे काही आपल्या संस्कृतीत रुजवलं, त्यामागे त्यांचा काहीतरी अनुभव असावा हे नक्की, असंही मला आताशा वाटू लागलंय.

लेखसंग्रह

राष्ट्रप्रेम;व्यक्त करणं आणि दाखवणं-

Category:

 

चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जात असताना उभं राहाण्याची गरज नसल्याचा निर्वाळा काल सर्वोच्च न्यायालयाने दिला. असा निर्वाळा देताना सर्वोच्च न्यायालयाने सन २०१६ साली चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवण्याची सक्ती करण्याविषयी स्वत:च दिलेल्या निर्णयातील शब्दरचना बदलण्याची तयारीही दर्शवली.

लेखसंग्रह

उद्याचा मराठवाडा’ दिवाळी अंक २०१७

Category:

 

या दिवाळी अंकात माझा ‘सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भविष्यातील राजकीय नेतृत्व’ या विषयवार लेख प्रसिद्ध झाला आहे. हा विषय मला देण्यात आला होता.