प्राचीन कोकणातील बंदरे
Category:
लेखसंग्रहव्यापार बहराला येण्यासाठी राजकीय स्थैर्य असण्याची आवश्यकता असते. मौर्य काळात आणि पुढे महाराष्ट्रात सातवाहन काळात अशा प्रकारचे राजकीय स्थैर्य मोठ्या काळासाठी उपलब्ध झाले आणि म्हणूनच सातवाहन काळात कोकणातील बंदरांतून पश्चिमेकडील देशांशी आणि विशेषकरून रोमन साम्राज्याशी मोठ्या प्रमाणात व्यापार होत असे.