लेखसंग्रह

ट्रॅव्हल अॅप्सची दुनिया 

Category:

 

आजच्या तरुणाईला खरं वेड लावलय ते मोबाईल आणि इंटरनेट यांनी. प्रत्येक गोष्टीत मदत हवी ती गुगलची. ( खरंतर सर्च इंजिन म्हणायला हवं पण आपण सर्रास गुगलच म्हणतो, असो.) पण नेमकं काय शोधायचं या सर्च इंजिनवर (किंवा गुगलवर म्हणा )? आजच्या तरुणाई कडून नक्की शिकण्यासारखी एक गोष्ट ती म्हणजे कितीही इंटरनेटवरून माहिती शोधली, बुकिंग केलं तरी ते प्रत्येक गोष्टीचा रिव्हवू त्याला मिळालेले रेटिंग यावरून निर्णय घेते. अर्थात ते तंतोतंत खरं असतं असं काही नाही.

लेखसंग्रह

स्पेस टुरिझम

Category:

 

अंतराळ पर्यटन म्हणजे गंमत म्हणून अंतराळ प्रवास. ऑर्बिटल, सबोर्बिटल आणि चंद्र स्पेस टूरिझम यासह अंतराळ पर्यटनाचे बरेच प्रकार संशोधकांच्या आणि यात काम करणाऱ्या कंपन्यांच्या डोक्यात आहेत. गेल्या काही वर्षात अवकाशात एक चक्कर मारणे शक्य झाले आहे. एका रशियन अवकाश एजन्सीने हे शक्य केले आहे.

लेखसंग्रह

कोकणभूमीतील घरगुती व्यवसाय

Category:

 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुसंख्य जनता मुंबईच्या चाकरमान्यावर अवलंबून असते. सुशिक्षिततेचे प्रमाण वाढल्याने या परिस्थितीत काही प्रमाणात फरक होताना दिसतो आहे. या सर्व परिस्थितीत सुधारणा व्हावी अशी नुसती अपेक्षा न करता त्यासाठी झटून काम करणारी कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली पाहिजे.

लेखसंग्रह

नोटा बंदीचे धोरण आणि चलन बदल

Category:

 

नोटाबंदीचा सर्वात मोठा परिणाम लघु उद्योगांवर झाला, नोटबंदीपूर्वी बहुतांशी उद्योगांमध्ये रोखीने व्यवहार होत होते. नोटाबंदीच्या काळात या उद्योगांमध्ये रोखीने व्यवहार होणे बंद झाले, रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांचे उद्योग ठप्प झाले. परंतु पुढील काळात परिस्थिती सुधारली.

लेखसंग्रह

जगण्याला प्रयोजन हवे

Category:

 

एक मोठे ध्येय डोळ्यासमोर होते. त्या ध्येयाने मला जिवंत ठेवले. त्या ध्येयाने मला तेथील छळ सोसायला बळ दिले. ज्याला जीवनाचे ध्येय मिळाले आहे, तो कोणतेही आघात सोसू शकतो, कोणतीही संकटे झेलू शकतो आणि कोणतेही दिव्य पार करू शकतो. फक्त मनुष्याला ध्येय हवे.
जगण्याला प्रयोजन हवे.

लेखसंग्रह

ग्रामसडक ते हमरस्ता

Category:

 

वरवर पाहता प्रमुख रस्त्यांचं जाळं कोंकणात विणल्याचं दिसत असलं तरी राष्ट्रीय महामार्ग वगळता अन्य रस्त्यांमध्ये सलगता आणि थेट जोडलेपणा यांचा अभाव आहे.

लेखसंग्रह

खडू नव्हे, दीपस्तंभ

Category:

 

दरवर्षी प्रमाणे आज म. द. वारे सरांना भेटायला मी त्यांच्या सहकार नगरमधील ‘स्नेहल’ बंगल्यावर गेलो. पहातो तो काय बंगल्याच्या फाटकाला कुलूप. शेजारची बेल वाजविल्यावर एकाने फाटक उघडले. वरती सरांच्या खोलीत जाऊन बसलो. दहा मिनिटांनी सर आले.
वर्षातून या दिवशीच मी सरांना भेटत असल्यामुळे, मधल्या कालावधीत न भेटल्याची मला खंत वाटत होती.

अर्थाने समर्थ होण्याचा स्वार्थ
लेखसंग्रह

अर्थाने समर्थ होण्याचा स्वार्थ

Category:

 

ख्रिस्त पूर्व काळात विकसित झालेल्या सिंधू खोऱ्यातील सभ्यतेमध्ये प्रगत आणि भरभराटीची आर्थिक व्यवस्था होती. सिंधू खोऱ्यातील लोक शेती, पाळीव प्राणी, तांबे, कांस्य आणि कथील यापासून अवजारे आणि शस्त्रे बनवत तसेच मध्यपूर्वेतील काही देशांशी व्यापारही करत.

लेखसंग्रह

ज्येष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे

Category:

 

‘ज्येष्ठ म्हणजेच श्रेष्ठ आणि श्रेष्ठत्व असलेला प्रत्येक जण ज्येष्ठ’ असं मी मानते. आज अनेक वर्षे कला क्षेत्रात काम करीत असताना नव्या आणि जुन्या पिढीतील प्रत्येक कलाकारांकडून अनेक गोष्टी नकळतपणे शिकायला मिळतात.

लेखसंग्रह

घरानंतरचं बाहेरचं जेवण..

Category:

 

फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, आदरणीय वसंत वाघ सरांचा मला महिन्यातून एकदा तरी फोन येतो, ‘गुडमाॅर्निंग सुरेशराव, मी डेक्कनला येतोय. पंधरा मिनिटांत ‘गुडलक’ला या.’ मी लगेचच निघतो. भिडे पुलावरुन पलीकडे गेलं की, दहाव्या मिनिटाला मी गुडलकला पोहोचतो. रिक्षा कडेला घेऊन सर उतरतात. आम्ही दोघे गुडलकमध्ये पलीकडील पॅसेजमधील एक टेबल पटकावतो. वेटरला दोन चहाची आॅर्डर दिल्यानंतर सर बोलू लागतात…