प्रवासाला निघताना
Category:
लेखसंग्रहपूर्वीच्या काळी प्रवास म्हणजे केवळ कामापुरता केला जायचा. पायी अथवा बैलगाडीने एका जागेतून दुसऱ्या जागी जाणं एवढंच होतं. मजल दरमजल केलेल्या या प्रवासात एक वळकटी, तांब्या, घोंगडी आणि सोबतीला बहु उपयोगी असा सोटा. प्रवास फक्त दिवसा करायचा आणि संध्याकाळी एखाद्या धर्मशाळेत किंवा देवळाबाहेर मुक्काम. तीर्थक्षेत्राला जाणं हा जीवनातला मोठा आणि किंबहुना शेवटचा आणि लांबचा प्रवास.