हौसेला मोल आणि पैश्याला किमंत नाही !
Category:
लेखसंग्रहकुठलाही सोहळा मग तो लग्न असो की आणि काही, साजरा करतांना सगळ्याच गोष्टींचे भान ठेवले पाहिजे. माझ्याकडे चिक्कार पैसा आहे म्हणजे मी तो कसाही खर्च करीन असे शक्यतो होऊ नये. शेवटी ज्याची त्याची विचारसरणी आहे. कोणावर कुठलीही गोष्ट लादू नयेत या विचारसरणीचा मी आहे. परंतू जी व्यक्ती कष्टाने पैसा कमावते, पैश्याची किंमत काय आहे ते जाणते, ती असा अमर्याद खर्च करणार नाही असे वाटते. पैसा कुठे, कधी, केव्हा व कोणावर खर्च करावा हा ज्याचा त्याचा व्यक्तीक प्रश्न आहे.