South Asia : भारताचे अशांत शेजारी (भाग एक)

भारताचा सख्खा शेजारी म्हणता येईल अशा बांगलादेशमध्ये 5 ऑगस्टला घडलेल्या घडामोडी आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम याबद्दल आतापर्यंत अनेकदा चर्चा झाल्या आहेत. मात्र त्यानिमित्ताने आणखी एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली, ती म्हणजे भारताचे अनेक शेजारी विविध कारणांमुळे अशांत, अस्वस्थ आहेत. काय आहेत यामागची कारणे आणि त्यांचा भारतावर होणारा परिणाम, याबद्दल एक छोटीशी मालिका आपण सादर करणार आहोत.



भारताचा सख्खा शेजारी म्हणता येईल अशा बांगलादेशमध्ये 5 ऑगस्टला घडलेल्या घडामोडी आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम याबद्दल आतापर्यंत अनेकदा चर्चा झाल्या आहेत. मात्र त्यानिमित्ताने आणखी एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली, ती म्हणजे भारताचे अनेक शेजारी विविध कारणांमुळे अशांत, अस्वस्थ आहेत. काय आहेत यामागची कारणे आणि त्यांचा भारतावर होणारा परिणाम, याबद्दल एक छोटीशी मालिका आपण सादर करणार आहोत. आजच्या या पहिल्या भागात आपण बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन देशांच्या परिस्थितीवर चर्चा करणार आहोत. यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन.

निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सरांचा परिचय –

राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत अनेक विषयांवर लेखन करणाऱ्या निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सरांना युद्ध सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. संरक्षण अभ्यासात सरांनी आपले MSc, M.Phil पूर्ण केले आहे. जुलै 1973 मध्ये सरांनी IMA डेहराडूनमध्ये प्रवेश घेतला आणि 1975 रोजी कमिशन्ड अधिकारी म्हणून ते उत्तीर्ण झाले. त्यानंतर 7 व्या मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये त्यांची नियुक्त झाली. जम्मू – काश्मीर, पंजाब आणि ईशान्येकडील भागात बंडखोरीविरोधी मोहिमांमध्ये सरांनी मोठ्या प्रमाणात काम केले आहे. 1975 पासून लष्कराने हाती घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये सर सहभागी झाले होते. ऑपरेशन ब्लू स्टारनंतर पंजाबमध्ये सर्वाधिक प्रभावीत झालेल्या जिल्ह्यांमध्ये शांतता राहावी यासाठी आखण्यात आलेल्या विशेष मोहिमेत सरांचा सहभाग होता. याशिवाय पूंछ आणि राजौरी भागात राबवण्यात आलेल्या ऑपरेशन रक्षकसाठी 7 व्या मराठा इन्फंट्रीची जबाबदारी सरांनीच संभाळली होती.

Author